शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘माजी’ की ‘माननीय’, ठरवा तुम्हीच!

By admin | Published: December 08, 2015 12:04 AM

एकदा का नावापुढे पद लागले की, पदाचा कालावधी संपल्यानंतरही पदाशिवाय समाजात मिरविणे अवघड होते. अशीच स्थिती सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे

मंगेश पांडे, पिंपरी एकदा का नावापुढे पद लागले की, पदाचा कालावधी संपल्यानंतरही पदाशिवाय समाजात मिरविणे अवघड होते. अशीच स्थिती सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे. माजी होऊन काहींना दोन वर्षे, तर काहींना तब्बल २५ वर्षे उलटली, तरीही अद्याप नावाअगोदर केवळ ‘मा’ असल्याचे फलक नजरेस पडत आहेत. त्यामुळे ‘मा’ म्हणजे माजी आहेत की ‘माननीय’ आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे. निवडणुकीत निवडून येण्यासाठी आटापिटा केला जातो. निवडून आल्यानंतर पाच वर्षे पद भोगले जाते. यामुळे पदाची एकप्रकारे सवयच लागलेली असते. मानपान, कार्यकर्त्यांचा गराडा, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश सोडणे यांमुळे पाच वर्षे उलटल्यानंतरही पदापासून दूर जावेसे वाटत नाही. राजकीय पदाचा कालावधी संपल्याने सभागृहात बसता येत नाही. शिवाय अधिकार गेले असले, तरीही किमान आपल्या नावात तरी पद असावे, अशी भाबडी अपेक्षा असते. त्यामुळेच माजी झाले, तरी केवळ ‘मा’ असाच उल्लेख केला जातो. रस्त्यावर ठिकठिकाणी, तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर मोठमोठे फलक उभारलेले असतात. ‘मा. ........’ यांच्या निवासस्थानकाकडे, असा उल्लेख केला जातो. संबंधितांच्या नावाअगोदर लावण्यात येणारे ‘माननीय’ आहे की ‘माजी’ हे ज्याला समजेल, त्याने समजून घ्यायचे, अशी स्थिती आहे. हे चित्र पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र दिसत आहे. शहरात महापालिका असल्याने महापौर, उपमहापौर, नगरसेवक, स्वीकृत सदस्य असे पदाधिकारी आहेत. गत पंचवार्षिकला १०५, तर या पंचवार्षिकला १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, अद्यापही गत पंचवार्षिकच्या ढीगभर ‘माजीं’नी फलक हटविलेले नाहीत. शिवाय, जे फलक आहेत, त्यावरील नावापुढेही ‘मा’ असाच उल्लेख पाहायला मिळत आहे. यासह शहराच्या हद्दीत दोन खासदार आणि तीन आमदार आहेत. यातील मागील पंचवार्षिकला असलेले एक खासदार पुन्हा निवडून आले आहेत, तर दुसरे खासदार पराभूत झाले. मात्र, हे खासदार माजी असा उल्लेख न करता ‘प्रथम खासदार’ असा उल्लेख करतात. यासह निवासस्थानाजवळील फलकावरही माजीऐवजी ‘मा’ असा उल्लेख केलेला आहे. तर, गेल्या पंचवार्षिकमधील तीन आमदारांपैकी दोन पराभूत झाले, तर एक पुन्हा निवडून आले. ‘माजी’ यांच्या नावाअगोदर अजूनही ‘मा. आमदार’ असेच झळकत आहे. यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद अद्यापपर्यंत २३ जणांनी भूषविले. यापैकी पाच माजी महापौरांचे निधन झाले आहे, तर सध्याच्या १७ माजी महापौरांपैकी ९० टक्के ‘माजीं’च्या निवासस्थानासमोर उभारण्यात आलेल्या फलकांवरील नावासमोर ‘मा’ असाच उल्लेख आहे. कुठे रस्त्यावर, तर कुठे पदपथावर, असे फलक उभारलेले असतात. यासाठी महापालिकेची परवानगी आहे की नाही, याकडेही लक्ष दिले जात नाही. दुर्दैव म्हणजे याबाबत कोणाकडून तक्रारही केली जात नाही.