पिंपरी: पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. बंद दाराआड चर्चा झाली.
पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे महत्त्व आहे. योगदान आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. पक्षाच्या प्रतिकूल कालखंडामध्ये आझमभाई यांनी राष्ट्रवादीची खिंड लढवली. पिंपरी चिंचवड मध्ये पानसरे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना मानणारा गट मोठा आहे. पानसरे यांना विधानसभा, मावळ लोकसभा निवडणूक लढवली. मात्र गावकी, भावकीच्या राजकारणाचा फटका बसला.
काही काळ भाजपबरोबर!
भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर तसेच महापालिकेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. दरम्यान चांगले काम करूनही यश मिळत नसल्याने पानसरे नाराज होते. पानसरे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आझम पानसरे यांचा भाजप प्रवेश घडवून आणला होता. मात्र तिथेही आझमभाईंवर अन्याय झाला. त्यानंतर पुन्हा भाईंनी स्वग्रही परतण्याचा निर्णय घेतला. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पानसरे हे साहेबांबरोबर की दादांबरोबर असा संभ्रम शहरात होता. आज पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी पानसरे यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते.
तिसऱ्या पिढीलाही साहेबांचे आकर्षण!
महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या आकर्षण विविध क्षेत्रातील मान्यवरांना, ज्येष्ठ, युवा, तरुण, लहान मुले अशा विविध वयोगटात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाराम कापसे यांच्या नातवास पवार साहेबांची भेट घ्यायची होती. सकाळी कापसे कुटुंबाने साहेबांची भेट घेतली व त्यांच्याबरोबर सेल्फी काढला. साहेबांनी कापसे यांच्या नातवाशी गप्पा मारल्या.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना मानणारा मोठा गट नेते या शहरांमध्ये आहेत. साहेबांनी शहराचा विकास केलेला आहे. त्यामुळे विकासाचे खरे साक्षीदार ज्येष्ठ नेते हे साहेबांबरोबर आहेत. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी आज सकाळी पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.''