शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

माजी सैनिक,विधवा पत्नींना संपूर्ण मिळकतकर माफ होणार; पिंपरी महापालिकेची कार्यवाही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 1:59 PM

राज्य शासनाच्या नव्या आदेशामुळे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मिळकतीवरील शंभर टक्के मिळकतकर माफ केला जाणार आहे..

ठळक मुद्दे शहरातील शौर्य पदकधारक, माजी सैनिक व त्यांच्या विधवांना संपूर्ण मिळकतकर माफीचा लाभ

पिंपरी : राज्य शासनाने माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना संपूर्ण मिळकतकर माफी योजना दिनांक ९ सप्टेंबरपासून लागू केली आहे. राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही कार्यवाही सुरू केली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीना महापालिकेच्या वतीने मिळकतकरातील सामान्यकरात पन्नास टक्के सूट दिली जात आहे. आता राज्य शासनाच्या नव्या आदेशामुळे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मिळकतीवरील शंभर टक्के मिळकतकर माफ केला जाणार आहे, तसे आदेश राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज संस्थांना ९ सप्टेंबरला दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत ही योजना लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, माजी सैनिक व त्यांच्या विधवांना संपूर्ण मिळकतकर माफीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.............‘‘माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मिळकत करमाफीच्या योजनेसंदर्भात राज्य शासनाचा आदेश पालिकेस प्राप्त झाला आहे. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मंजुरी घेऊन तो लागू केला जाईल. तो कधीपासून लागू करायचा. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांमध्ये ज्यांनी मिळकतकर भरला आहे, त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे, चर्चा करून ठरविण्यात येणार आहे.-स्मिता झगडे, सहायक आयुक्त, मिळकत कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरWomenमहिलाSoldierसैनिक