पिंपरी : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३२ प्रभागांत १२८ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. अनेक नव्या चेहऱ्यांना मतदारांनी निवडून दिले आहे. भाजपाच्या उमेदवारीवर प्रभाग क्रमांक ३१ मधून अमरनाथ कांबळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, तर प्रभाग क्रमांक ३२ मधून संतोष कांबळे, शारदा सोनवणे, उषा ढोरे, हर्षल ढोरे आणि प्रभाग क्रमांक १८ मधून सुरेश भोईर आणि राजेंद्र गावडे हे नवे चेहरे निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक १७ मधून करुणा चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, सचिन चिंचवडे, प्रभाग क्रमांक १९ मधून नेताजी शिंदे, कोमल मेवानी, प्रभाग क्रमांक २९ मधून सागर अंघोळकर,उषा मुंढे, शशिकांत कदम, पल्लवी जगताप या नव्या उमेदवारांना संधी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून संजय नेवाळे, योगिता नागरगोजे हे दोन नवीन उमेदवार मतदारांनी निवडून दिले आहेत. प्रभाग क्रमांक १६ मधून बाळासाहेब ओव्हाळ, प्रभाग क़्रमांक १५ मधून शैलजा मोरे, शर्मिला बाबर, प्रभाग क्रमांक १३ मधून कमल घोलप,उत्तम केंदळे निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक १० मधून अनुराधा गोरखे, केशव घोळवे, तुषार हिंगे या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक ७ मधून सोनम गव्हाणे, संतोष लांडगे, सुनीता लांडगे, प्रभाग क़्रमांक ८ मधून नम्रता लोंढे, प्रभाग क़्रमांक ५ मधून प्रियंका बारसे, सागर गवळी या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मनीषा पवार, अभिषेक बारणे यांना प्रभाग क़्रमांक २३ मधून संधी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक २७ मधून बाबा त्रिभुवन, सुनीता तापकीर हे नवीन चेहरे निवडून दिले आहेत.राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खानोलकर प्रभाग क़्रमांक १६ मधून विजयी झाल्या. प्रभाग क़्रमांक ८ मधून माजी आमदार विलास लांडे यांचे चिरंजीव विक्रांत लांडे, प्रभाग क़्रमांक २५ मधून मयूर कलाटे यांना संधी मिळाली आहे. शिवसेनेचे अमित गावडे प्रभाग क्रमांक १५ मधून विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक १४ मधून प्रमोद कुटे आणि प्रभाग क्रमांक २५ मधून राहुल कलाटे, अश्विनी वाघमारे, रेखा दर्शिले यांना संधी मिळाली आहे. शीतल कुटे, कैलास बारणे या अपक्ष उमेदवारांनाही मतदारांनी संधी दिली आहे. (वार्ताहर) पॅनेल टू पॅनलमध्ये भाजपाची सरशीपिंपरी : महापालिकेच्या सावत्रिक निवडणुकीत ३२ प्रभागांत १२८ जागांसाठी निवडणूक झाली. पॅनल टू पॅनल उमेदवार निवडून आणण्यात भाजपा आघाडीवर आहे. पाठोपाठ राष्ट्रवादी आहे. प्रभाग क्रमांक १२ रुपीनगर, तळवडेमध्ये आणि प्रभाग क्रमांक ९ मासुळकर कॉलनी या दोन प्रभागांसह प्रभाग क़्रमांक २ मोशी-जाधववाडी, प्रभाग क्रमांक ७ गव्हाणेवस्ती सॅन्डविक कॉलनीमध्ये धावडेवस्ती आणि प्रभाग क्रमांक ३२ जुनी सांगवी, पिंपळे गुरव या चार प्रभागांमध्ये भाजपाचे पॅनल विजयी झाले. प्रभाग क्रमांक १९ एम्पायर इस्टेट प्रभागात आणि प्रभाग क्रमांक २९ पिंपळे सौदागरमध्ये भाजपाचे पॅनल विजयी झाले आहे. (प्रतिनिधी)
चाळीस टक्के नव्या चेहऱ्यांना संधी
By admin | Published: February 24, 2017 2:38 AM