पिंपरी : निवडणूक आयोगाच्या पथकाला निगडी परिसरात एका व्यक्तीकडे दीड किलो सोने आढळून आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, खरेदीची पावती नसल्याचे निदर्शनास आले. निगडी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रहाटणीतील बनावट नोटांचे प्रकरण चर्चेत असताना, विनापावती सोने घेऊन जाणाऱ्या एकाला पकडण्यात आल्याने निवडणूक काळात गैरप्रकार घडत असल्याची जोरदार चर्चा आहे. परेश सुरू असे त्या व्यक्तीचे नाव आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. संशयित वाहने थांबवून त्या वाहनांची तपासणी केली जात आहे. शुक्रवारी पथकाने भक्ती-शक्ती चौकात एकाला हटकले. त्याच्याकडे तब्बल १४५० ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले. (प्रतिनिधी)
निगडीत आढळले दीड किलो सोने
By admin | Published: February 18, 2017 3:18 AM