शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
शिवसेनेत आमदारकीच्या तिकीटासाठी २०-२० कोटींची मागणी; लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर गंभीर आरोप
3
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
4
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
5
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
6
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
7
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
8
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
9
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
10
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
11
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
12
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
13
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
14
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
15
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
16
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
17
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
18
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
19
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
20
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

‘नार्कोटिक्स’मधून बोलत असल्याचे सांगून फसवणाऱ्या चौघांना अटक; पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलकडून कारवाई

By नारायण बडगुजर | Published: August 06, 2024 5:55 PM

तुमच्या नावाने जात असलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून महिलेची २४ लाखांची फसवणूक केली

पिंपरी : मुंबई येथून इराण येथे तुमच्या नावाने पार्सल जात असून त्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, असे सांगून महिलेची २४ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार संशयिताना पिंपरी-चिंचवड सायबर सेलने अहमदनगर, जळगाव आणि सुरत येथून अटक केली.

स्वरूप अशोक खांबेकर (४२, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), पुष्कर चंद्रकांत पाखले (रा. चखाळीसगाव, जि. जळगाव), मोनीक भरतभाई रंगोलीया, कौसिक मन्सुखभाई बोरड (दोघे रा. सुरत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाणेर येथील ३८ वर्षीय महिलेने याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाइल क्रमांकधारकाने फिर्यादी महिलेला फोन केला. तो फेडेक्स कुरीअर कंपनी, मुंबई अंधेरी येथून बोलत असल्याचे भासवले. तुमचे मुंबई ते इराण असे कुरिअर जात आहे. त्या औषधाच्या कुरिअरमध्ये एका औषधामध्ये ड्रग्ज आहे, असे सांगत तुमचा कॉल नार्कोटिक्स विभागाला ट्रान्सफर करतो, असे म्हणत संशयिताने कॉल दुसऱ्या संशयिताला जोडला. त्यानंतर दुसऱ्या संशयिताने ते पार्सल कस्टमवाल्यांनी अटकवून ठेवल्याचे सांगितले. तुम्हाला मुंबई येथे येऊन ते तुमचे पार्सल नाही हे क्लियर करावे लागेल किंवा ऑनलाइन स्काइप ॲपवरून बोलून क्लियर करावे लागेल, असे सांगितले. स्काइप ॲपच्या माध्यमातून संशयितांनी फिर्यादी महिलेच्या मोबाइलच्या स्क्रिनचा ॲक्सेस मिळवला. महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून २४ लाख ९९ हजार ९९८ रुपये बँक खात्यावर घेतले. याबाबत हिंजवडी पोलिस तपास करीत होते. याच गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी - चिंचवड सायबर सेलकडून सुरू होता.

सायबर पोलिसांनी संशयितांच्या बँक खात्याची माहिती मिळवली. त्याद्वारे संशयितांची ओळख पटवून त्याला अहमदनगर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करत त्याच्या इतर तीन साथीदारांची माहिती घेऊन त्यांनाही जळगाव आणि सुरत येथून ताब्यात घेतले. संशयितांनी वापरलेल्या बँकेच्या खात्यावर दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत. त्या खात्याबाबत भारतातून ६८ तक्रारी आलेल्या आहेत.

सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल देवडे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, पोलिस अंमलदार दीपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, स्वप्नील खणसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसWomenमहिलाDrugsअमली पदार्थMONEYपैसा