ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 10 - जुनी सांगवी येथील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास चोरट्यांनी घरातील तब्बल 21 तोळे सोने व 10 हजार रोख असा एकूण 4 लाख 18 हजारांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश आनंद कांबळे (रा. अंशु अपार्टमेंट, हत्ती गार्डन समोर जुनी सांगवी) हे कमावर गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोड़ून घरातील 2 सोन्याचे गंठण,2 नेक्लेस, 5 अंगठ्या,3 सोनसाखळ्या, 1 नथ, 1 वाटी मंगळसूत्र, 20 हजार रुपयांचे चांदीचे दागीने व वस्तू तसेच 10 हजार रोख असा एकूण 4 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.