पिंपरी : आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी चार जणांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिघी पोलिसांनी बुधवारी पहाटे चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मावस भावानेच खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अजय मेटकरी याच्यासह प्रफुल्ल गबाले, राज खेडकर आणि संतोष माने या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि अजय याने कांबळे यांना शिवीगाळ आणि मारहाणसुद्धा केली होती. या भांडणानंतर अजयने वेळोवेळी कांबळे यांना मारण्याचीही धमकी दिली होती. त्यामुळे या खूनप्रकरणी अजय हाच संशयित आरोपी असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी मंगळवारी दिघी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार दिघी पोलिसांनी बुधवारी अजयसह अन्य तिघांनाही ताब्यात घेतले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.
आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांच्या हत्याप्रकरणी चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:14 IST
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे....
आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांच्या हत्याप्रकरणी चौघे ताब्यात
ठळक मुद्देमावस भावानेच हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड