पिंपरी : वेगवेगळ्या प्रकरणात चार मोबाईल फोन चोरीला गेल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडला. अनोळखी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश ऋषीकुमार मोरे (वय २०, रा. गंगानगर, पेठ क्रमांक २८, प्राधिकरण) रविवारी (दि. ७) बिजलीनगर येथील रेल्वेस्टेशन टनेल जवळून गुरुव्दारा रस्त्याने मित्राकडे जात होेते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडविले. मारहाण करून जखमी करून त्यांच्याकडील ३६ हजार ९०० रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून अनोळखी व्यक्तींनी चोरून नेला. प्रथमेश मोरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.दुसऱ्या घटनेत प्रवीण लक्ष्णम माने (वय ३१, रा. शिवतेज हाउसिंग सोसायटी, चिखली) सोमवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास स्पाईन रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. प्रवीण माने यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.तिसºया घटनेत घरफोडी करून चोरट्यांनी दोन मोबाईल फोन लंपास केले आहेत. बापूराव बाळासाहेब सूर्यवंशी (वय ३०, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बापूराव सूर्यवंशी यांचे घर आतून बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने खीडकीतून हात घालून घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. घरातील १६ हजार ३०० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन घरफोडी करून चोरून नेले आहेत. दि. १८ मार्चला रात्री ११ ते दि. १९ मार्चला पहाटे चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
चोरट्यांनी लंपास केले चार मोबाईल फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 5:12 PM