पिंपरी : माहेराहून दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला उपाशीपोटी ठेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत घडली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिया समीर शेख (वय १९, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती समीर बाबू शेख (वय २३), शकीरा बाबू शेख (वय ४०), बाबू मुसा शेख (वय ५०), आमिना मेहमुद्दीन शेख (वय ६५) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. शेख मदीना इफरोश (वय ४२, रा. उपळी, जि. बीड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०१९ ते १० मार्च या कालावधीत घडला. आरोपींनी फ्लॅट घेण्याकरिता नाझिया हिला माहेराहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. तिला किरकोळ कारणावरून मानसिक त्रास दिला जात असे. मारहाण करून उपाशीपोटी ठेवले जात असे. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून अखेर नाझियाने १० मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चार जण गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 1:24 PM