पिंपरी : फेडिक्स कुरिअर कंपनीमधून बोलत आहे. तुमच्या नावाचे मुंबई येथून तैवानकरिता इनलिगल पार्सल जात आहे. मी सायबर क्राइममधून डीसीपी अजयकुमार बन्सल बोलतोय, अशी ओळख करून दिली. तसेच बँक अकाउंटची माहिती घेत तब्बल नऊ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगून फसवणूक केली. ही घटना ९ मार्चला निगडी प्राधिकरण येथे घडली. या प्रकरणी महिलेने सोमवारी (दि. २७) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेला संपर्क करणाऱ्या मोबाइलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला फोन करून त्यांच्या नावाचे मुंबई येथून तैवानकरिता इनलिगल पार्सल जात आहे, असे सांगितले. तसेच फिर्यादीचे बँकमधून इनलिगल ट्रान्जेक्शन होत आहे. त्यामुळे पैसे इतर अकाउंटवर पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे ट्रान्सफर करताना नऊ लाख ६० हजार ९९९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.