पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास १२ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी येथे ५ ते ३० जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी येथील ४० वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी (दि. ३१) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात संशयितांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इन्स्टाग्रामवरून शेअर मार्केटच्या संबंधित एक लिंक मिळाली. अगर आपको शेअर मार्केटके बारेमे सिखना है तो ग्रुप जाॅइन करो, असे त्यात नमूद होते. त्यानुसार फिर्यादीने संबंधित लिंकवर क्लिक केले. त्यानंतर फिर्यादी यांना एका व्हाटसअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. ग्रुपमध्ये संशयितांनी तसेच कस्टमर केअर म्हणून काम पाहणाऱ्या इतर संशयितांनी संगणमत करून शेअर मार्केटच्या नावाखाली आयपीओ विषयी फिर्यादीला माहिती दिली. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. तसेच तीन कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्याच्या नावाखाली एकूण १२ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली.
'शेअर मार्केटके बारेमे सिखना है तो ग्रुप जाॅइन करो..'असा मेसेज करत केली १२ लाखांची फसवणूक
By नारायण बडगुजर | Updated: February 1, 2025 18:44 IST