शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

लॉटरी लागल्याचे सांगून व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 7:01 PM

शंभर काेटीची लाॅटरी लागली असल्याचे सांगून विविध चार्चेसच्या नावाखाली व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.

पिंपरी : मित्राला शंभर कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याचे पैसे व्यावसायिकाच्या खात्यात जमा करायचे आहेत, असे आमिष दाखविले. वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली १ कोटी ५२ लाख २७ हजार ४०० रुपये बँकेच्या खात्यात भरण्यास सांगितले. १४ जणांनी मिळून एका व्यावसायिकाची फसवणूक केली. केरळ, दिल्ली आणि वाकड येथे आॅगस्ट २०१२ ते एप्रिल २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राकेश गंगाधर कोटोल (वय ४४, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा फिर्यादी राकेश यांना फोन आला. त्यांचे मित्र के. शिवदासन यांना शंभर कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याचे पैसे राकेश यांच्या खात्यावर जमा करायचे आहेत. त्यासाठी जीएसटी, ट्रान्सफर चार्जेस, ड्युमरेज चार्जेस, कन्वर्जन चार्जेस, मनी लाँडरिंग चार्जेस, प्रोसेसिंग फी, स्टॅम्प चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस आणि हॉटेल बिल अशा विविध चार्जेसच्या नावाखाली पैशांची मागणी केली. वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये राकेश यांच्याकडून खात्यावर १ कोटी ५२ लाख २७ हजार ४०० रुपये घेतले. सर्व प्रकारच्या चार्जेसचे पैसे देऊनही आरोपींनी लॉटरीचे पैसे राकेश यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राकेश यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी