शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

काटकसरीने पाणी वापरासाठी कपात, कालवा समितीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:29 AM

कालवा समितीचा निर्णय : महापालिकेने दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडी पाणी उचलावे

पिंपरी : पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे असून, त्यासाठी महापालिकेने दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे, असा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरावे, असे पत्र पाठबंधारे विभागाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले आहे.

शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेला पवना धरणातून वार्षिक ४.८४ टीएमसी पाणी वापरास सरकारने मंजुरी दिली आहे. पवना धरणातून महापालिका दररोज ४८० एमएलडी पाण्याचा उपसा करते. रावते बंधाºयातून पाणीउपसा करून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधारा गाळाने भरला आहे. त्यामुळे बंधाºयाची पातळी थोडी जरी कमी झाली तरी महापालिकेचे पंप बंद पडतात. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. पवना धरणातून रावेत बंधाºयापर्यंत पवना नदीची लांबी ३८ किलोमीटर असून, पाणी सोडल्यानंतर बंधाºयापर्यंत पोहोचण्यास चौदा तासाचा वेळ लागतो. महापालिका मंजुरीपेक्षा जास्त पाणी उचलत आहे. रावेत बंधाºयातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून जास्त विसर्ग केल्यामुळे जास्तीचे पाणी वाया जात आहे. पावसाळ्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस बंद पडला. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. परिणामी, धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलैपर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पवना धरणामध्ये पाणीसाठा तुलनेने कमी आहे. त्यामुळे शहराचा पाणीवापर ४४० एमएलडीच ठेवावा, असे कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे.आंद्रा धरणातून दोन टक्के पाणीकपातपिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून ४८.५७६ दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर अशा एकूण १४८.२३६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मुदतवाढ देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने दोन आठवड्यापूर्वी घेतला होता. मात्र, आंद्रा धरणातील पाण्यात दोन टक्के कपात केली असून, ३६.८७ दशलक्ष घनमीटर पाणी मिळणार असल्याचे शुद्धीपत्रक मंगळवारी जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केले आहे.

शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होत आहे. दररोज ४८० एमएलडी पाणी शहरासाठी उचलण्यात येते. शहराची लोकसंख्या २२ लाख झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे अन्य मार्गाने पाणी आणण्याची मागणी होत आहे. भामा-आसखेड धरणातील १६७ एमएलडी आणि आंद्रा धरणातील १०० एमएलडी पाणी आरक्षित ठेवले होते. मात्र, पुनर्स्थापना खर्चापोटी २३८.५३ कोटी रुपये न भरल्याने आरक्षण रद्द झाले होते.दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेतली. त्यानंतर भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून शहरासाठी आरक्षित पाणी करारास मुदतवाढ देण्याची मागणी शासनाच्या जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानुसार २४ आॅक्टोबरला आरक्षण मंजूर झाले होते. आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर करण्यात आले होते. मात्र, दोन आठवड्यांनंतर या पाण्यात दोन टक्क्यांनी कपात केली आहे. या संदर्भातील शुद्धिपत्रक जलसंपदा विभागाचे उपसचिव अ. अ. कपोले यांनी मंगळवारी प्रसिद्ध केले. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड