शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 5:42 PM

पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक येथे काम सुरू आहे.

ठळक मुद्देलष्कराला महापालिका देणार पावणे तीन कोटी; स्थायीची मंजुरी 

पिंपरी : पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक ते पिंपळे सौदागर शिवार चौक येथील रस्त्याच्या ४५ मीटर रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जागेच्या मोबदल्यात संरक्षण विभागाने मागणी केलेला दोन कोटी ६५ लाख ४८ हजार ३५१ रूपयांचा निधी देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.  महापालिकेची स्थायी सभा झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस स्थापत्य विभागाच्या वतीने शहरातील काही मार्गावर रूंदीकरणाचे कामे सुरू आहेत. त्यापैकी पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक येथे काम सुरू आहे. त्या अंतर्गत जगताप डेअरी चौक ते शिवार चौक या दरम्यानच्या ४५ मीटर रस्त्याच्या दक्षिणेकडील संरक्षण विभागाची सीमाभिंत आहे. त्याला लागून स्ट्रॉम वॉटर वाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, हे काम संरक्षण विभागामार्फत थांबविण्यात आले होते. याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तसेच पालिकेच्या अधिकाºयांनी औंधच्या ३३० इन्फ्रन्टी बिग्रेडचे कॅप्टन दिलीप शेखर यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यांनी आर-९ रस्त्यासंदर्भात उर्वरित २ कोटी ६५ लाख ४८ हजार ३५१ रुपये संरक्षण विभागास अदा करण्याचा सूचना केल्या. पैसे अदा केल्यानंतरच या जागी काम करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या जागेसाठी चार कोटी चाळीस लाख ६२ हजार ३५१ रूपयांची मागणी संरक्षण विभागाने केली होती. पालिकेने आतापर्यंत १ कोटी ७५ लाख १४ रूपयांची रक्कम संरक्षण विभागास अदा केली आहे. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. व संबंधित कामाची रक्कम तातडीने देण्याचा विषय मंजूर केला. थांबलेले काम सुरू करण्यासाठी उर्वरित २ कोटी ६५ लाख ४८ हजार ३५१ रुपये संरक्षण विभागास देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpale guravपिंपळेगुरवpimpale saudagarपिंपळे सौदागर