पिंपरी : तडिपारी आदेशाचे उल्लंघन करून परिसरात वावरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिंचवड येथील दळवीनगर झोपडपट्टीत करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सूरज बाळू पांडागळे (वय २६, रा. दळवीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सूरज हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला ३१ जानेवारी २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीसाठी पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडिपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो शनिवारी दळवीनगर येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
तडीपार गुंडाला अटक
By admin | Published: January 24, 2017 2:15 AM