पुणे : पर्यटन राज्यमंत्री, महापौर, सभागृह नेता अशा विविध पदे भषुविलेले चंद्रकांत छाजेड यांच्या पार्थिवावर बोपोडी येथील स्मशानभूमीत शोकपुर्ण वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘‘चंद्रकांत छाजेड हे कार्यकर्त्यांना मोठे करणारे नेते होते. महापालिकेत त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या मोठेपणाचा वारंवार अनुभव आला. कार्यकर्त्यांसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असे.’’ यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.काँग्रेस भवन येथे सायंकाळी ६ वाजता शोकसभा घेण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी उपमहापौर आबा बागूल तसेच पक्षाचे पालिकेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व विविध आघाडट्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. बागूल यांनी नगरसचिव कार्यालयाला पत्र पाठवून छाजेड यांच्या श्रद्धांजलीसाठी खास सभेचे आयोजन करावे असा प्रस्ताव दिला आहे. पालिकेतील सभागृह नेता हे पद सरकारकडून निर्माण करण्यात तसेच आमदार झाल्यानंतरही नगरसेवक म्हणून पालिकेच्या कामकाजात भाग घेता येईल असा कायदा करण्यात छाजेड यांचा मोठा वाटा होता. (प्रतिनिधी)
चंद्रकांत छाजेड यांच्यावर अंत्यसंस्कार
By admin | Published: January 14, 2017 2:47 AM