शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप

By विश्वास मोरे | Published: September 28, 2023 4:24 PM

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेश भक्तांनी भर दिला तसेच नदी मूर्ती विसर्जन करण्याचे टाळले. पावणेचारपर्यंत उघडीप दिलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे...

पिंपरी : गेले दहा दिवस विराजमान असणाऱ्या गणरायाला पिंपरी- चिंचवड शहरातील गणेशभक्तांनी गुरुवारी निरोप दिला.'' बाप्पा मोरया रे,  मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत अपूर्व उत्साहात भक्तांनी गणरायाला निरोप दिला. सकाळी आणि दुपारच्या टप्प्यामध्ये घरघरात स्थापन केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेश भक्तांनी भर दिला तसेच नदी मूर्ती विसर्जन करण्याचे टाळले. पावणेचारपर्यंत उघडीप दिलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे. 

पिंपरी -चिंचवड शहरामध्ये गेल्या दहा दिवसांपासून विराजमान असणाऱ्या गणरायाला निरोप देण्याची वेळ समीप आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच  शहरातील २६ विसर्जन घाटावर गणेश भक्त मूर्ती  विसर्जनासाठी येत होते. सकाळच्या टप्प्यामध्ये घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात येत होते. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणुकीची तयारी सुरू झाली होती. पावसाची उघडीप अससल्याने मंडळाचे कार्यकर्ते सकाळपासूनच मिरवणुकीची तयारी करताना दिसून आले.चिंचवडमधील सोहळ्याची तयारी!

पिंपरी -चिंचवड औद्योगिक नगरीतील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील चिंचवड मधील मिरवणूक पाहण्याजोगी असते. चिंचवड गावातील चापेकर चौकातून वाल्हेकर वाडी रस्त्याने थेरगाव पवना नदी घाटावर गणरायाचे विसर्जन करण्यात येते. महापालिकेच्या वतीने चापेकर चौकामध्ये स्वागत कक्ष उभारलेला आहे. तसेच पुढे विसर्जन मार्गापर्यंत बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे. मार्गावर गणेश भक्तांना नमो चहा वाटप करण्यात येत आहे. तसेच काँग्रेसच्या वतीने ही स्वागत कक्ष उभारलेला आहे.

नदीत मूर्ती विसर्जन करण्याचे टाळले!

पिंपरी चिंचवड शहरातील २६ विसर्जन घाटांवर गणेश विसर्जन करण्यात आले. शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी अशा तीन नद्या वाहतात या तीनही नद्यांच्या घाटांवर महापालिकेच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे फलक लावण्यात आलेले आहेत तसेच नदीपात्राला बॅरीकेटींग करण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी गणेश विसर्जन मिरवणुक सोहळ्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा आढावा घेतला. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी,  कृत्रिम हौद उभारण्यात आल्याने त्यामध्ये गणेश भक्त गणरायाचे विसर्जन करत असल्याचे दिसून आले. 

सीसीटीव्हीची नजर!

चिंचवड गावातील चापेकर चौक तसेच विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे. तसेच गणेश विसर्जन घाटावर सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. सोहळ्यावर सीसीटीव्हीची नजर असल्याचे दिसून आले. मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तसेच महापालिकेचे आरोग्य, वैद्यकीय, अग्निशामक दलाचे पथक, विसर्जन घाटावर सेवा देत असल्याचे दिसून आले.

हलक्याशा पावसाच्या सरी!

सायंकाळी पावणे चारपर्यंत पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे सकाळच्या टप्प्यामध्ये घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.  सायंकाळी पावणे चार नंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली. गणेश भक्तांचा उत्साह पुन्हा वाढला. दुपारी चार पर्यंत चिंचवडच्या मिरवणुकीस सुरुवात झालेली नव्हती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे