पिंपरी : ऐन गणेशोत्सवाच्या काळात गांधीनगर कामगार भवनजवळ मंगळवारी रात्री दोन टोळक्यांनी गुंडगिरी, दादागिरीचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झालेल्या भांडणात आम्हीच या भागाचे ‘दादा’ आहोत, कोणी मध्ये येऊ नये. असा आरडा ओरडा करणाºया गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन टोळक्यांमुळे रहिवाशांनी घाबरून अक्षरश: घराचे दरवाजे बंद करून घेतले. दोन्ही टोळक्यांनी पोलिसांकडे परस्परविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत.राहुल भिसे (वय २२, रा. गांधीनगर) याने सहा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यात दिनेश शिंगाडे (वय २५) सुनील तेलकर (वय २५), किरण गुरखा(वय २५), सुरेश धोत्रे (वय २४), आकाश बाबावले (वय १९, सर्व रा. खराळवाडी) आणि एकअल्पवयीन मुलगा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.फिर्यादीत दिल्यानुसार फिर्यादीचा भाऊ संजय भिसे यास दिनेश शिंगाडे मारहाण करीत होता. फिर्यादी सोडविण्यास गेला त्या वेळी शिंगाडे याने फिर्यादीच्या डोक्यात आणि संजय भिसे याच्या तोंडावर सिमेंट ब्लॉक मारले. त्यांना जखमी केले. भांडण सोडविण्यास आलेल्या काल्या बोचकुरे यास सुनील तेलकर, किरण गुरखा, सुरेश धोत्रे, आकाश बाबावले यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यांना जखमी केले. आम्हीच या भागातील दादाआहोत, मध्ये कोणी पडू नये, त्यांच्याकडू बघून घेऊ असे धमकावत होते. त्यांच्या दहशतीला घाबरून नागरिक सैरभर पळून गेले. घराचे दरवाजे बंद केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
गांधीनगरमध्ये दहशतीसाठी गुंडांचा धूडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 6:19 AM