शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

गॅस चोरी करणाऱ्या टोळीला अटक

By admin | Published: June 10, 2017 2:11 AM

गॅस टँकरमधून घरगुती वापराच्या गॅसची चोरी करणाऱ्या परप्रांतिय टोळीच्या तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : गॅस टँकरमधून घरगुती वापराच्या गॅसची चोरी करणाऱ्या परप्रांतिय टोळीच्या तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.खबऱ्याकडून माहिती मिळाल्याने सुदुंबरे (ता. मावळ) गावाच्या शिवारात मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. कारवाईत दोन हजार किलो वजनाचा सुमारे एक लाख रुपये किमतीचा घरगुती वापराचा गॅस व ८० सिलिंडर टाक्या जप्त करण्यात आले. टँकरचालक लक्ष्मण गुजर त्याचे साथीदार महिपाल बिष्णोई, महेंद्र बिष्णोई, विजय बिष्णोई, गोपाळ बिष्णोई, बाळू रोटे, प्रदीप सिंग, राकेश जाजू या आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने बुधवार (दि. १४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मावळ तालुक्यातून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून मोठ्या प्रमाणात घरगुती वापराच्या गॅस टँकरची वाहतूक होते. गॅस चोरीच्या प्रकाराने नागरिक त्रस्त होते. या कारवाईत २ हजार किलो वजनाचा घरगुती गॅस किंमत ९६,१४० रुपये, दोन मालवाहू वाहने व गॅस टँकरमधून गॅस सिलिंडर टाकीत भरण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.