शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

विकासनगरमध्ये टोळक्याचा धुडगूस

By admin | Published: July 04, 2017 3:40 AM

विकासनगर-किवळे व शितळानगर परिसरात दहा-बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने रविवारी मध्यरात्री एकावर प्राणघातक हल्ला करीत दत्तनगर

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : विकासनगर-किवळे व शितळानगर परिसरात दहा-बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने रविवारी मध्यरात्री एकावर प्राणघातक हल्ला करीत दत्तनगर व मुकाई चौक भागातील दहा-बारा वाहनांची, तसेच मुकाई चौकातील छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांची व हातगाड्यांची तोडफोड करून पसार झाले आहेत.दरम्यान, तोडफोड सत्राने परिसरात दहशत पसरली आहे. नितेश दिलीप गोसावी (वय २५ ,रा.शितळानगर नं. १, देहूरोड) असे गंभीर जखमीचे नाव असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अरूण मुकेश हस्तोडीया, संदेश ऊर्फ दाद्या होळकर, योगेश होळकर, शुभम ऊर्फ छोट्या गोवे, विशाल होळकर, सागर भालेराव त्यांचे ५ ते ६ जण साथीदारांविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितळानगर येथील ओमप्रक्राश प्रोव्हिजन स्टोअर्सजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्यांनी गोसावी याला तू राहुल विश्वकर्मा सोबत का फिरतो, असे टोळक्याने विचारणा करीत तलवार, कोयत्याने दोन्ही पायांवर वार करून बेदम मारहाण केली. रात्र गस्तपथकावरील देहूरोड पोलीस वेळीच पोहोचल्याने टोळके पसार झाले. सशस्त्र टोळक्याने किवळे, मुकाई चौक,दत्तनगर ,शितळानगर व एम बी कॅम्प परिसरात दहशत पसरवीत ५ ते ६ फास्टफूड दुकाने, हातगाड्यांची तोडफोड करीत परिसरातील ५ मोटार , २ टेम्पो, स्कूल बस आणि ४ मोटरसायकली अशा बारा वाहनांची तोडफोड केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून चाललेल्या टोळक्याच्या उच्छादाने देहुरोड पोलिसांची तारांबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी देहूरोड येथील बापदेवनगरजवळील श्रीनगर येथे मध्यरात्री एक दुचाकी जाळण्यात आली होती, तर शनिवारी रात्री मुकाई चौकातील दुकाने व हातगाड्यावाल्यांना टोळक्यांनी सशस्त्र धमकावीत हप्ता वसूल करण्याचा प्रकार घडला होता.धास्तावलेले संबंधित व्यावसायिकांनी पोलिसांत तक्रार न दिल्याने याप्रकरणी कोणतीही माहिती पोलीस ठाण्यात उपलब्ध नव्हती. देहूरोड, विकासनगर -किवळे व शितळानगर परिसरात गटातटांच्या भांडणामुळे टोळ्या निर्माण होत आहेत.