विश्वास मोरे, पिंपरी: पुणे मुंबई महामार्गावर निगडी येथील भक्ती-शक्ती पुन्हा जवळ अंडर पासचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी गुरुवारी रात्री गॅस टँकरला अपघात झालेला आहे. त्यामध्ये एक जण जखमी झालेला आहे. भक्ती शक्ती चौकाकडून मधुकर पवळे उड्डाणपूल कडे जाणाऱ्या रस्त्याच्या अलीकडे अंडर पाच चे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे त्या ठिकाणी वाहतूक वळवण्यात आलेले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील महिन्यात गॅस टँकर पलटी होऊन गळती झाली होती. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी अपघात झाला आहे.
मुरबाड (ठाणे) येथून मुंढवा पुण्याकडे द्रव ऑक्सिजन वाहतुक करणारा. एम एच केए-०१-९८४० क्रमांकचा टॅंकर निगडी येथे अपघातग्रस्त झाला असून पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन टीम,आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळीं पोहोचली आहे.
प्राथमिक माहितीनुसार कोणतीही गॅस गळती झाल्याचे दिसून आढळून आले नाही. त्यामुळे धोका टाळला आहे. पोलीस, अग्निशामन विभाग, आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी कार्यरत आहे. वाहनातील ऑक्सिजन रिकॉव्हरीसाठी तळोजा येथून वाहन मागविण्यात आले आहे. कंपनीचे तांत्रिक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत . सशहर अभियंता प्रमोद ओंभासे, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चीपाडे हे घटनास्थळी उपस्थित आहेत. टँकर मधील कर्मचारी सुखदेवसिंह चौहान (वय ४८ वर्षे ) जखमी असून त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.