शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उद्योगनगरीला जीबीएसचा विळखा; वैद्यकीय विभाग अलर्ट, रुग्णांची संख्या १ २ वर

By प्रकाश गायकर | Updated: January 23, 2025 17:36 IST

शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहेत.

पिंपरी :पुणे शहरासह उद्योगनगरीमध्ये एका नवीन आजाराने डोके वर काढले आहे. शहरात गेल्या काही दिवसांत गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे १२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये अचानक सुन्नपणा येणे, हाता पायांना मुंग्या येऊन स्नायू कुमकुवत होतात. या आजाराची परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, मंगळवारपासून त्यामध्ये अचानक वाढ झाली. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, शीघ्र कृती दल, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी यांची तातडीची बैठक पार पडली. यामध्ये आजाराचा प्रसार, संसर्गाचा स्त्रोत, रुग्णांची आणि नमुन्यांची तपासणी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. तसेच रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे.दरम्यान, शहरात गुरूवार (दि. २३) पर्यंत १२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४ रुग्णांची नोंद संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात झाली आहे. आतापर्यंत महापालिका व खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या १२ रुग्णांपैकी ६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सहा रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोणत्या भागात किती रुग्णठिकाण - रुग्ण - बरे झालेले रुग्णसंत तुकारामनगर - ५ - २मोशी - ३ - २चिखली - १ - ०कासारवाडी - २ -१वाकड - १ - १ काय आहेत लक्षणे?१) हातापायातील ताकद कमी होणे२) हातापायाला मुंग्या येणे३) गिळण्यास व बोलण्यास त्रास होणे४) धाप लागणे व श्वास घेण्यास त्रास होणे काय काळजी घ्यावी१) पाणी उकळून व गाळून प्यावे२) उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे३) हातापायांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास तपासणी करून घ्यावी.

हा आजार नवीन नसून यापूर्वी देखील या आजाराचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळल्यास तातडीने महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणी करावी. या आजारासाठीची सर्व औषधे महापालिका रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी देखील रुग्ण आढळल्यास तातडीने महापालिकेला कळवावे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स