शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

सोशल मीडियावर सर्रास वाङ्मयचौर्य

By admin | Published: July 17, 2017 4:12 AM

प्रत्येकामध्ये लेखक, कवी किंवा साहित्यिक दडलेला असतो. कोणाला छान कविता, कथा सुचते तर कोणी एखाद्या घटनेचे छान विश्लेषण करते...

प्रज्ञा-केळकर-सिंग। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रत्येकामध्ये लेखक, कवी किंवा साहित्यिक दडलेला असतो. कोणाला छान कविता, कथा सुचते तर कोणी एखाद्या घटनेचे छान विश्लेषण करते... आपले लेखन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडले जाते ते सोशल मीडियाचे माध्यम. एखादा रसिक आपली कविता, लेखन आवडीने शेअर करतो, तेव्हा आपल्याला आनंदच होतो...मात्र, एखादे वेळी आपलेच लेखन तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने सोशल मीडियावर दृष्टीस पडते, तेव्हा मोठा धक्का बसतो. आजकाल सोशल मीडियावर वाङ्मयचौर्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. आपण कॉपीराईट कायद्याचा भंग करत आहोत, हे या ‘वाङ्मयचोरां’च्या ध्यानीमनीही नसते. अशा परिस्थितीत मूळ लेखकाला कॉपीराईट कायद्याचा भंग झाल्याची रीतसर तक्रार करता येऊ शकते. मात्र, जनजागृतीअभावी अशा प्रकारे तक्रारी नोंदवल्या जाण्याचे प्रकार केवळ १०-२० टक्केच आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया... आपले विचार, लेखन, विश्लेषण सोशल मीडियावर व्यक्त करुन त्यातून चर्चा, मार्गदर्शन आणि विचारमंथन घडावे, यादृष्टीने अनेक उदयोन्मुख लेखक सोशल मीडियावर सक्रिय असतात. एखाद्याचा विशिष्ट विषयामध्ये हातखंडा असतो. कोणाला सामाजिक, राजकीय परिस्थितीवर उत्तम भाष्य करता येते, तर कोणाचा ललित लेखनात हातखंडा असतो. प्रत्येकाला आपले पुस्तक किंवा लिखाण प्रकाशित करणे जमेलच असे नाही. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ब्लॉग आदींच्या माध्यमातून लिखाणाला नवे धुमारे फुटत असतात. बरेचदा, एखादी व्यक्ती मूळ लेखकाची परवानगी न घेता हे लिखाण त्याच्या वॉलवरुन कॉपी करून स्वत:च्या वॉलवर, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अथवा एखाद्या प्रकल्पामध्ये पेस्ट करुन वाहवा मिळवते. येनकेनप्रकारेण, आपल्या लेखनाची चोरी होत असल्याचे मूळ लेखकाच्या निदर्शनास आल्यानंतर धक्का बसतो, चिडचिड आणि मनस्ताप पदरी पडतो. बरेचदा मूळ लेखक कॉपी, पेस्ट केलेल्या लेखनाचे स्क्रीन शॉट काढून ते शेअर करुन असे प्रकार उघडकीस आणताना दिसत आहेत. त्यामुळे वाङ्मयचौर्याला अल्प प्रमाणात आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, याबाबत अधिक जागरूकता आणि सावधगिरी बाळगून रीतसर तक्रार नोंदवता येऊ शकते. कायद्याच्या चौकटीतून अशा प्रकारांना आळा घालता येतो, असे मत आयटी कायद्याच्या जाणकार वकील अ‍ॅड. वैशाली भागवत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. प्रत्यक्ष लेखनाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक लेखनालाही साहित्याचा दर्जा आपोआप प्राप्त होतो. कोणत्याही प्रकारची नोंदणी न करताही या लेखनाला स्वामित्वहक्क प्राप्त होतो. यामध्ये लेखनाचा, भाषांतराचा, नवनिर्मितीचा समावेश होतो. त्यामुळेच सोशल मीडियावरील लेखन अथवा आशयाला कॉपी राईट आणि आयटी कायदा लागू होतो. मूळ लेखनाची कोणीही चोरी केल्यास, लेखकाचे नाव बदलून स्वत:च्या नावाने पोस्ट केल्यास, डाऊनलोड केल्यास अथवा हे लेखन कोणत्याही प्रकारे जसेच्या तसे वापरल्यास कॉपीराईट कायद्याच्या ६३ (ब) कलामांतर्गत आणि आयटी कायद्याच्या ४३ब (ब) या कलमांतर्गत गुन्हा अथवा तक्रार नोंदवली जाऊ शकते. बरेचदा एखादी कथा अथवा लेखन जसेच्या तसे न उचलता त्यातील ठरावीक भाग उचलण्याचे प्रकार घडतात. एखाद्या लेखकाचे लेखन स्वत:च्या नावाने व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवले जाते. अशा परिस्थितीतही कायद्याचा भंग होतो. मात्र, फारसे नेटिझन्स याबाबत तक्रार दाखल करण्याबाबत उत्सुकता दाखवत नाहीत. माझ्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागेल, कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील, पैसे आणि वेळ खर्च होईल, अशी यामागची मानसिकता असते. मात्र, तरुणांनी याबाबत जागरूकता बाळगणे गरजेचे असल्याचे मत अ‍ॅड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केले.