पिंपरी : महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या ‘लोकमत’च्या वतीने पिंपरी-चिंचवड परिसरातील वाचकांसाठी ‘वाचक वर्गणीदार योजना’ सुरू केली आहे. त्यासंबंधी वाचकांना आवाहन केले आहे. ज्या वाचकांची दोनशे रुपये वाचक वर्गणीदार योजनेतील तिसरी भेटवस्तू दिलेल्या सेंटरवरून देण्याची मुदत संपली, तरी पिंपरी-चिंचवड कार्यालयातून भेटवस्तू घेऊन जाण्यासाठी आवाहन केले. ‘लोकमत’ने वाचकांसाठी ‘वाचक वर्गणीदार योजना’ सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासाठी सुरु करण्यात आलेली ८ केंदे्र बंद करण्यात आली असून, ज्या वाचकांनी भेटवस्तूचे तिसरे कुपन देऊन भेटवस्तू नेलेली नाही. त्यांना लोकमतच्या पिंपरी येथील कार्यालयातून (विशाल ई-स्क्वेअर, पिंपरी) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत भेटवस्तू दिली जाणार आहे. वाचकांनी येताना तिसरे कुपन कार्यालयात देऊन गिफ्ट घेऊनजावे. तसेच पुढील दोन वर्षांच्या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दोनशे रुपयांचा धनादेश, फोटो आयडी झेरॉक्स, चालू महिन्याचे विक्रेत्याचे बील देऊन चारशे पन्नास रुपयांची भेटवस्तू घेऊन जावी, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पिंपरी कार्यालयातून मिळणार भेटवस्तू
By admin | Published: April 22, 2017 3:52 AM