पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहर, हवेली, मावळ व मुळशीतही मुलींनी बाजी मारली आहे. पिंपरी-चिंचवडचा निकाल ९४.३३ टक्के इतका लागला आहे. त्यात मुलींचे प्रमाण ९५ टक्के, तर मुलांचे प्रमाण ९३ टक्के इतके आहे. त्यामुळे उद्योगनगरीच्या पोरी हुश्शार असल्याचे सिद्ध झाले आहे.निकाल असल्याने सकाळपासूनच मुलांमध्ये उत्सुकता होती. बारा वाजल्यापासूनच मुले सायबर कॅफेमध्ये जागा धरून बसली होती. दुपारी एक वाजताच संकेतस्थळावर निकाल खुला करण्यात आला. शहर, मावळ आणि मुळशी, हवेतील सुमारे ४१९ शाळांचा निकाल जाहीर झाला.
मावळात ९३ टक्के निकालपरीक्षेला शहरातील १७ हजार ८०८ विद्यार्थी बसले होते. त्यात मुले ९२२० असून, मुलींची संख्या ८१८८ आहे. त्यापैकी ०९९१ हजार ८४६ मुले, तर ७८८३ मुली असे एकूण १६ हजार ७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची टक्केवारी ९३ असून, मुलींची टक्केवारी ९५ आहे. या व्यतिरिक्त पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकालही वाढला आहे.मावळचा निकाल ९३.३१ टक्के, तर मुळशीचा निकाल ९२.३३ टक्के, हवेलीचा निकाल ९२.७८ टक्के लागला आहे. मावळात मुलींचा निकाल ९४.४४ तर मुळशीत ९३.२१ टक्के लागला आहे.
शतकवीर शाळा वाढल्यापिंपरी-चिंचवड, मावळ, मुळशी तालुक्यातील शंभरहून अधिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक आहे. मराठी शाळांचा निकाल कमी लागला आहे. इंग्रजी शाळांतील टक्केवारी वाढतच आहे. त्या तुलनेत मराठी शाळांची टक्केवारी कमी होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत आहे.महापालिका शाळांचा निकाल ८५ टक्केपिंपरी : दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेचा निकाल ८५.४ टक्के लागला आहे. यंदाचा निकाल तीन टक्क्यांनी वाढला आहे. तर क्रीडा प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.महापालिकेच्या संत तुकारामनगर, खराळवाडी, नेहरुनगर, क्रीडा प्रबोधिनी, लांडेवाडी, भोसरी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड, थेरगाव, केशवनगर, आकुर्डी, काळभोरनगर, रुपीनगर आणि निगडी या ठिकाणी माध्यमिक शाळा आहेत.एकूण २२३९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील १८९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ३४७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अठरा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले. तर, अठरा विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. ३७ विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले.क्रीडा प्रबोधिनीची शंभर टक्के निकालाची परंपराशहरात क्रीडा प्रबोधिनी विद्यालय नेहरुनगर येथे चालविले जाते. महापालिकेने या विद्यालयाची सुरुवात अठरा वर्षांपूर्वी केली. मागील पाच वर्षांपासून शाळेचा निकाल सातत्याने शंभर टक्के लागतो. ती परंपरा याही वर्षी कायम आहे.