शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
2
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
3
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
4
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
5
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
6
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती
7
LLC 2024 : जणू काही 'लसिथ मलिंगा'! मराठमोळ्या केदार जाधवच्या गोलंदाजीने जुन्या आठवणींना उजाळा
8
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
9
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
10
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
11
महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका
12
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
13
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
14
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
15
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
16
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
17
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
18
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
19
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची गळा आवळून हत्या, आरोपीला सोलापूरमधून अटक

By प्रकाश गायकर | Published: September 14, 2024 9:55 PM

विनायक अनिल आवळे (वय ३५, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पळून गेलेल्या आरोपी प्रियकरास सोलापूरमधून पोलिसांनी अटक केली. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली. शिवानी सोमनाथ सुपेकर (वय २८) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. विनायक अनिल आवळे (वय ३५, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास जगतापनगर, थेरगाव येथे रिक्षामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. ती महिला रिक्षा चालक विनायक याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे समजले. घटनेनंतर तिचा प्रियकर विनायक हा पळून गेल्याचे निष्पन्न झाले. विनायक याचा शोध घेण्यासाठी वाकड पोलिसांनी दोन पथके तयार केली. विनायक हा विजापुर, कर्नाटक येथे पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली. तो विजापुर येथून परत सोलापूरच्या दिशेने प्रवास करत असताना तपास पथकाने पाठलाग करुन त्यास सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. विनायक याला शिवानी यांच्या चारित्र्यावर संशय आल्याने त्याच्या राहत्या घरामध्ये गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली.ही कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महानवर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, गोरख कुंभार, सहायक निरीक्षक अर्जुन पवार, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द सावर्डे, विभीषण कन्हेरकर यांनी केली.आरोपी सराईत गुन्हेगारआरोपी विनायक आवळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०१३ मध्ये पुणे रेल्वे स्टेशनमध्ये चोरीचा, २०१६ मध्ये भोसरी पोलिस ठाण्यात खुनी हल्ल्याचा, २०१९ मध्ये भोसरी पोलिस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा, २०२० मध्ये पिंपरी पोलिस ठाण्यात मारहाण केल्याचा आणि २०२४ मध्ये वाकड पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस