पिंपरी : मित्राने मैत्रिणीचा मोबाईल फोन हॅक करत मोबाईलमधून बँकेची गोपनीय माहिती घेत मैत्रिणीच्या क्रेडीट कार्ड वरून खरेदी करत फसवणूक केली. हा प्रकार ३१ जुलै ते १ सप्टेंबर या कालावधीत हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. ११) सोमवारी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित ईशान विनायक कौशल (वय ३१) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे मोबाईलचे गुगल ड्राईव्ह फुल झाले. त्यामुळे त्या एक्स्ट्रा मेमरी गुगलवरून विकत घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या मोबाईल मधील डेटाचा बॅकअप त्यांचा मित्र संशयित ईशान याच्या मेलवर जात आहे.
ईशान याने फिर्यादी यांचा मोबाईल हॅक करून त्यांची बँकेची गोपनीय माहिती घेत त्या आधारे क्रेडीट कार्ड वरून ८२ हजार २१३ रुपये किंमतीचा मोबाईल फोन खरेदी करत फसवणूक केली.