पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहर, मावळ व मुळशीतही मुलींनी बाजी मारली आहे. पिंपरी-चिंचवडचा निकाल ९०.८७ टक्के इतका लागला आहे. त्यात मुलींचे प्रमाण ९४.५८ टक्के, तर मुलांचे प्रमाण ८७.९९ टक्के इतका लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दुपारी एकला जाहीर झाला. कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तीनही शाखांसाठी शहरातील विद्यार्थी परिक्षेस बसले होते. निकाल असल्याने सकाळपासूनच मुलांमध्ये उत्सुकता होती. बारा वाजल्यापासूनच मुले सायबर कॅफेमध्ये जागा धरून बसली होती. दुपारी एक वाजताच संकेतस्थळावर निकाल खुला करण्यात आला. शहर, मावळ आणि मुळशीतील सुमारे ४७ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.बारावीच्या परीक्षेला पिंपरी-चिंचवड शहरातील १६ हजार३५७ विद्यार्थी बसले होते. त्यातमुले ८९४३ असून, मुलींची संख्या ७०२४ आहे. त्यांपैकी ७ हजार ८४६ मुले, तर ७०१८ मुली असे एकूण १४ हजार ८६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची टक्केवारी ८७.७९ असून, मुलींची टक्केवारी ९४.५८ आहे. या व्यतिरिक्त पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ३८.३५ टक्के आहे.दरम्यान, विद्यार्थी-पालकांना असलेली निकालाची उत्सुकता संपली असून, आता ठरविलेल्या शाखेत प्रवेश घ्यायचा यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मावळचा निकाल ८९.११ टक्के, तर मुळशीचा निकाल ८९.२ टक्के लागला आहे. मावळात मुलींचा निकाल ९४.८०, तर मुळशीत ९३.५९ टक्के लागला आहे.४७ महाविद्यालये शतकवीरपिंपरी-चिंचवड, मावळ, मुळशी तालुक्यातील ४७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक आहे. मराठी शाळांचा निकाल कमी लागला आहे. इंग्रजी शाळांतील टक्केवारी वाढतच आहे. त्यात तुलनेत मराठी शाळांची टक्केवारी कमी होत आहे. याबाबत चिंता व्यक्त होत आहे.शंभर टक्के निकाल :गायत्री इंग्लिश मीडिअम स्कूल, मोशी (विज्ञान); आदर्श ज्युनियर कॉलेज, तळेगाव (वाणिज्य); आॅल सेंट चर्च हायस्कूल, लोणावळा; जैन ज्युनियर कॉलेज, तळेगाव दाभाडे; एचबीपीएन काशीद पाटील कॉलेज; रायवुड इंग्लिश मीडिअम स्कूल, लोणावळा; माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, मुळशी; न्यू मिलेनियम स्कूल, नवी सांगवी (विज्ञान); सीके गोयल कॉलेज, खडकी (विज्ञान); जयहिंद हायस्कूल, पिंपरी; फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवड (विज्ञान); नृसिंह विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी (वाणिज्य); गोदावरी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी (वाणिज्य); भारतीय जैन विद्यालय, पिंपरी वाघेरे (विज्ञान); कॅम्प एज्युकेशन सोसायटी, निगडी (विज्ञान); स्वामी समर्थ विद्यालय, भोसरी (विज्ञान); केजे गुप्ता कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवड; मॉडर्न हायस्कूल, यमुनानगर (वाणिज्य); एस. एस. अजमेरा हायस्कूल, पिंपरी (विज्ञान); डीवाय पाटील कनिष्ठ महाविद्यालय, शाहूनगर (कला, विज्ञान); निर्मल बेथनी हायस्कूल, काळेवाडी; शिवभूमी विद्यालय, निगडी (विज्ञान); अमृता विद्यालय, निगडी; क्रांतीवीर चापेकर विद्यालय, चिंचवड (कला); नागनाथ गडसिंग कॉलेज, चिंचवड (विज्ञान); एसएनबीपी कॉलेज, मोरवाडी, पिंपरी (विज्ञान); सेंट उर्सुंला आकुर्डी (विज्ञान, वाणिज्य); कमलनयन बजाज स्कूल, आकुर्डी (विज्ञान); सरस्वती इंग्लिश मीडिअम स्कूल कुदळवाडी (विज्ञान); संचेती ज्युनियर कॉलेज, थेरगाव (विज्ञान); प्रियदर्शनी इंग्लिश मीडिअम स्कूल, भोसरी (विज्ञान); अनुसया वाढोकार विद्यालय, चिंचवड (विज्ञान); होरायझन इंग्लिश मीडिअम स्कूल, दिघी; सरस्वती विद्यालय, निगडी (वाणिज्य); पी.बी. जोग कॉलेज, चिंचवड (विज्ञान); स्वामी समर्थ इंग्लिश मीडिअम स्कूल, भोसरी (विज्ञान); गीतामाता इंग्लिश मीडिअम स्कूल (विज्ञान); सिटी प्राईड स्कूल, निगडी (वाणिज्य); क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल, आकुर्डी (विज्ञान); एसएनबीपी ज्युनियर कॉलेज, रहाटणी (विज्ञान); सुरेश मोरे महाविद्यालय, रावेत (वाणिज्य); एस.बी. पाटील कॉलेज, रावेत (विज्ञान); किलबील ज्युनियर कॉलेज, पिंपळेगुरव (विज्ञान); एसएनबीपी कॉलेज चिखली (विज्ञान); युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज, बोराडेवाडी (विज्ञान, वाणिज्य)
पिंपरी-चिंचवडमध्ये मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 7:45 AM