शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

उद्योगनगरीत मुलींची बाजी

By admin | Published: May 31, 2017 2:32 AM

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महाविद्यालयांतून बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण १६ हजार ४६३ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार १८९ विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महाविद्यालयांतून बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण १६ हजार ४६३ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील बारावीचा निकाल ९२.२६ टक्के लागला आहे. निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.४४ असून, मुलांची टक्केवारी ८९.५९ इतकी आहे. १०० टक्के निकाल लागलेल्यांमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. एचएससी बोर्ड पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या बारावीतील विद्यार्थ्यांनी २०१७ च्या निकालात उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. ३१ महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांमध्ये शिवभूमी विद्यालय, निर्मल बेथेनी, अमृता विद्यालय, डी़ वाय़ पाटील महाविद्यालय, सेंट उर्सुला, प्रियदर्शनी या महाविद्यालयांचा समावेश आहे. विज्ञान शाखेचा बहुतांशी विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागलेली शहरातील २० महाविद्यालये आहेत. ‘नवमहाराष्ट्र’ची आघाडी पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयातून किमान कौशल्यावर अधारित अभ्यासक्रम घेतलेले ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर न्यू इंग्लिश स्कूल, आबासाहेब चिंचवडे महाविद्यालयाचा या अभ्यासक्रमाचा निकाल ९१ टक्के लागला आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचा निकालसुद्धा ९१ टक्के आहे. नोव्हेल इन्स्टिट्यूटचा ७८ टक्के निकाल लागल आहे. फत्तेचंद जैन विद्यालयाचा निकाल ९६ टक्के आहे.कला शाखेचा निकाल कमी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या तुलनेत कला शाखेचा निकाल कमी लागल्याचे दिसून येत आहे. सावित्रीबाई विद्या सेंटर, निगडी, प्रियदर्शनी विद्यालय,भोसरी ही विद्यालये कला शाखेच्या १०० टक्के निकालास अपवाद वगळता अन्य विद्यालयांमध्ये कला शाखेचा निकाल ९० टक्यापर्यंत लागला आहे. प्रियदर्शनी विद्यालयात एकाच विद्यार्थ्याने कला शाखेतून परीक्षा दिली होती. सवित्रीबाई विद्यालयातून १८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.