शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

एमसीए सीईटी न दिलेल्यांना संधी द्या

By admin | Published: May 30, 2017 2:24 AM

एमसीएसाठी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून केली आहे. निगडी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : एमसीएसाठी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून केली आहे. निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शिक्षणमंत्री तावडे रविवारी निगडीत आले होते. पालकांच्या वतीने सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी खासदार गजानन बाबर, शिवसेनेचे माजी सपंर्कप्रमुख नंदकुमार सातुर्डेकर यांनी निवेदन दिले. सध्याचे युग हे संगणकाचे युग असल्याने बीसीए, एमसीए,आदी कोर्सेसकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा आहे. मात्र, बीसीए झाल्यानंतर एमसीएला प्रवेशासाठी मागील वर्षांपासून सीईटी परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. वास्तविक बीसीए परीक्षेनंतर नोकरी शोधावी, की एमसीए ला प्रवेश घ्यायचा याबाबत विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. त्यांना संबंधित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये याबाबत योग्य ते मार्गदर्शनही मिळत नाही. एमसीएला प्रवेश घ्यावा असे त्यांना वाटते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यांचे वर्ष वाया जाते. एकतर प्लेसमेंट शोधणे अथवा वर्षभरासाठीचा एखादा कोर्स करणे एवढाच मार्ग त्यांच्यासमोर शिल्लक राहतो. त्यामुळे सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.मागील वर्षीही सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पुणे विद्यापीठाने ती अमान्य केली. या वर्षीही एमसीए अभ्यासक्रमास प्रवेशासाठी अठरा मार्चला सीईटी परीक्षा घेण्यात आली़ मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही. अशा विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.