पिंपरी : ‘‘सरकारने कामगार कायद्यात मालकधार्जिण बदल केले आहेत. कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणावर समाविष्ठ करून, कायम कामगारांसाठी स्वेच्छा निवृत्त योजना (व्ही.आर.एस.), करार संशोधन योजना(सीआरएस) या योजना आणून कायम कामगारांची संख्या कमी करण्यावर भर देत आहे.’’ असे आरोप कामगार नेते भालचंद्र कानगो यांनी केले. आकुर्डी येथील ग्रीव्हज कॉटन अॅण्ड अलाईड कंपनीज युनियनच्या सर्वसाधारण सभेत कानगो बोलत होते. लोककल्याणकारी योजनेवरील खर्च कमी करुन परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. याचा परिणाम कामगार वर्गावर होत आहे. कामगारांचे काम बाहेर नेत आहेत. कामगार वर्गाने या निर्णयाच्या विरोधात एकत्र येऊन लढले पाहिजे. अधिक रोजगाराच्या संधीची मागणी केली पाहिजे. कायम स्वरुपी काम, कर्मचारी राज्य विमा(ईएसआयसी) आणि पेन्शनची तरतूद झाली पाहिजे. बोनस आणि ग्रज्युटी वरील मर्यादा वाढवली पाहिजे. किमान वेतन १५००० रुपये केले पाहिजे, अशी मागणीही कानगो यांनी केली. कदम यांनी प्रास्ताविक केले. गोडसे, रोहम यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
कायम कामगार कमी करण्यावर सरकारचा भर
By admin | Published: December 06, 2015 11:59 PM