शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

सुभेदारांनी घडविले सत्तांतर

By admin | Published: February 24, 2017 3:05 AM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे एकाकाळीचे कट्टर समर्थक असलेले आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे या

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे एकाकाळीचे कट्टर समर्थक असलेले आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे या सुभेदारांनीच हे सत्ता परिवर्तन घडवून आणले. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकमुखी सत्ता उलथवून लावताना १२८ पैकी ७७ जागा जिंकून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळविले. गेल्या १० वर्षांपासून महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्विवाद सत्ता आहे. या काळात शहरात उभारलेले उड्डाणपूल, बीआरटी प्रकल्प अशा विकास कामांवर राष्ट्रवादीचे नेते व पदाधिका-यांना पुन्हा सत्ता मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपाने हादरे देण्यास सुरवात केली होती. दोन वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेत सत्ता परिवर्तन करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील २२ जगताप समर्थक नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर भोेसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे व पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे यांनीही समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसून भाजपाची ताकद अचानक वाढली. दिग्गजांच्या पक्षांतरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीशा लक्ष घातले.वाढीव टक्केवारीचाभाजपाला फायदागेल्या २० वर्षांनंतर प्रथम महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का ६८ टक्क्यांपर्यंत वाढला. मतदानाचा वाढलेला टक्का हे सत्ता परिवर्तनाचे द्योतक मानले जाते. हा टक्का भाजपच्याच पारड्यात पडल्याचे स्पष्ट झाले आहे. समाविष्ट गावांमधून विक्रमी मतदान झाले होते. महामार्गाच्या दुतर्फा चकाचक दिसणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील समाविष्ट गावांची दुखणी आजही कायम आहेत. येथील मतदारांनी मतदान यंत्राव्दारे आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे समाविष्ट गावांमध्ये भाजपच्या पॅनलच्या पॅनल विजयी झाले. तसेच शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या ग्रामीण भागात भाजपाने लक्ष दिल्याने मोठ्याप्रमाणावर यश मिळाले. मात्र, या वाढीव मतदानाचा व नव मतदारांचा फटका सत्ताधारी राष्ट्रवादीला बसला. त्याबरोबरच काँग्रेसलाही त्याची झळ पोहोचली असून, एकाही जागेवर त्यांना यश आले नाही. तसेच शिवसेनेचे संख्याबळही पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. गुरूची विद्या गुरूलाफोडाफोडीचे राजकारण करून सत्ता अबाधित ठेवायची हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंत्र अवलंबिले. त्यांच्याच मुशीत तयार झालेले आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे हे एकवटले आणि राष्ट्रवादीची सत्ता उलथून लावण्यासाठी नारा दिला. राष्ट्रवादीचे २६ नगरसेवक फोडून भाजपात प्रवेश दिला. प्रत्येक महापालिका निवडणूकीत फोडाफोडीचे राजकारण पवार करायचे. शिष्यांनी गुरूची विद्या गुरूला शिकवून महापालिकेत सत्ता मिळविली. बंडखोरी रोखण्यात यशभारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहिर करताना बंडखोरी होणार नाही, याबाबत दक्षता घेतली होती. तसेच यादी जाहिर केल्यानंतर नाराज झालेल्यांचीही मनधरणी केली होती. त्यामुळे बंडखोरांचा रोष कमी होऊन हे बंडखोर पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम काम केले. याचा परिणाम निकालात दिसून आला. गळती रोखण्यात राष्ट्रवादीला अपयशराष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्या वर्षभरापासूनच गळती लागली होती; ती रोखण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फारशे प्रयत्न केले नाहीत. भाजपची गाजर पार्टी अशी टीका राष्ट्रवादीने केली होती. नोटा बंदीचा अपप्रचार राष्ट्रवादी व शिवसेनेने केला. मात्र, मतदार राजाने नोटाबंदीचे स्वागत केल्याचेही निकालावरुन स्पष्ट झाले आहे. महासाधू मोरया गोसावी आणि क्रांतिवीर चापेकरबंधूंच्या चिंचवड या भूमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा नारळ फोडला. त्या वेळी एकहाती सत्तेचा नारा दिला होता. चिंचवड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मोरया गोसावी यांच्यामुळे चिंचवडला वेगळी ओळख आहे. क्रांतिवीर चापेकरांची ही जन्मभूमी आहे. मोरया गोसावी यांचे आशीर्वाद आणि क्रांतिवीर चापेकरांच्या पुण्याईमुळे हा क्रांतिकारी विजय मिळाला आहे. स्वच्छ कारभारासाठी भाजपाला मतदान करा, अशी हाक मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यास पिंपरी-चिंचवडकरांनी साथ दिली आहे. जनतेने दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ ठरविणार आहोत.- लक्ष्मण जगताप (शहराध्यक्ष, भाजपा, आमदार)पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजनबद्ध विकास राष्ट्रवादीने केला आहे. हे सत्य सर्व राजकीय पक्ष मानतात. ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांनी शहराचा सुनियोजित विकास केला. जेएनएनयुआरएमअंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामांचाही निधी शहरात आणला गेला. असतानाही बेस्ट सिटी, स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला असतानाही विकासाला मतदारांनी नाकारले आहे. जनतेचा कौल मान्य करावाच लागेल. पराभव मान्य आहे. अपयश आले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. - संजोग वाघेरे (शहराध्यक्ष राष्ट्रवादी)पराभव विनम्रपणे स्वीकारतो. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सुरूवातीपासूनच शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला होता. याबाबत सर्वपक्षीयांनी तक्रारीही केल्या होत्या. सर्वच प्रभागातील निकाल हे आश्चर्यकारक आहेत. शहरातील अनेक प्रभागांत उमेदवारांनी हरकती घेतल्या आहेत. भाजपाने कट कारस्थान करून विजय मिळविला आहे. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. तसेच पिंपळेनिलख प्रभागातील मतमोजणी थांबविण्यात आली आहे. - सचिन साठे, (शहराध्यक्ष, काँग्रेस)निवडणूकीत शिवसेनेला १४ जागा मिळालेल्या होत्या. या निवडणूकीत पक्षाला ९ जागा मिळालेल्या आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात शिवसेनेने यश मिळविले. मात्र, गतवेळीच्या तुलनेत जागा कमी झाल्या आहेत. वाकड परिसरात प्रथमच चारपैकी शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. माझ्यासह तीन उमेदवार विजयी झाले. विजयाचा आनंद असला तरी महापालिका निवडणूकीत जागा कमी मिळाल्याचे शल्य आहे.-राहूल कलाटे (शहरप्रमुख, शिवसेना)