पिंपरी : हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीकडे जाणा-या चिंचवड -वाकड रस्त्यावर डांगे चौकात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी डांगे चौक येथे ग्रेड सेपरेटर करण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिका-यांना दिल्या.चिंचवड -वाकड रस्त्यावर डांगे चौकात वाहतूककोंडीला नागरिकांना रोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आयटीपार्कला जाणाºयांना त्रास सहन करावा लागतो. या भागातील वाहतूककोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे. या प्रश्नाबाबत महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड आदी उपस्थित होते. चिंचवड ते वाकड यादरम्यान वाहतूककोंडीच्या समस्येचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. या वाहतूककोंडीचा व या मार्गावरील वाहनांचा अभ्यास करून उपलब्ध परिस्थितीत थेरगाव येथील डांगे चौकात ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) करण्याच्या सूचना जगताप यांनी दिल्या आहेत.>असा होणार प्रकल्पग्रेड सेपरेटरची एकूण लांबी ४६० मीटर असून, ग्रेड सेपरेटरच्या बॉक्सची लांबी ६१ मीटर राहील. भूमकर चौक वाकड बाजूने २२४ मीटर, तर चिंचवडच्या बाजूने १७५ मीटर लांब राहणार आहे. तर, ग्रेड सेपरेटरची रुंदी १५.५० मीटर इतकी राहील. दोन्ही बाजूने ७ मीटर रुंद लेन ये-जा करण्यासाठी राहणार आहे. तर, उंची ५.५० मीटर राहील. हा ग्रेड सेपरेटर करत असताना कमीत कमी वेळ वाहतूक वळवून हे काम त्वरित पूर्ण करावे. अशा सूचनाही आयुक्त हर्डीकर व संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत.
डांगे चौकात उभारणार ग्रेड सेपरेटर, थेरगाव चौकातील कोंडी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:53 AM