शिरगाव : सोमाटणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत चौराईदेवी, देवीआई, सर्वपक्षीय ग्रामविकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखून १३ पैकी ११ जागी उमेदवार निवडून येऊन एकहाती सत्ता काबीज केली आहे. यामध्ये तरुण उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रतिस्पर्धी चौराईदेवी सर्वपक्षीय ग्रामविकास पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. अपक्ष एकही उमेदवार निवडून आलेला नाही. निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदारांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना पसंती दिली नाही. मागील पाच वर्षांतील कामाची पोचपावती मिळाली असल्याचे मत पॅनलप्रमुख राजेश मुऱ्हे यांनी व्यक्त केले.गावपतळीवर पक्ष बाजूला ठेवून, विकासाचे राजकारण करून सोमाटणे गावाच्या विकासाला प्राधान्य देऊ, असे मत विजयी उमेदवारांनी व्यक्त केले. पराभूत उमेदवारांनी जनतेने दिलेला कौल मान्य करून विकासकामे करून पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ, असे मत व्यक्त केले.विजयी उमेदवार : वॉर्ड क्र. एकमध्ये गोकुळ गुलाब गायकवाड, नलिनी रजनीकांत गायकवाड, राकेश शहाजी मुऱ्हे, वॉर्ड दोनमधून अरुणा गोरख माळी, सचिन शाबू मुऱ्हे, सुप्रांची विशाल मुऱ्हे, वॉर्ड क्र. ३मधून उमेश माणिक जव्हेरी, आशा सोपान मुऱ्हे, सुजाता अविनाश मुऱ्हे, वॉर्ड क्र. चारमधून सुरेखा प्रकाश जगदाळे, स्वाती बबन कांबळे (बिनविरोध), वॉर्ड क्र. पाचमधून पूजा नवनाथ मुऱ्हे, सुधीर दिलीप मुऱ्हे. (वार्ताहर)
ग्रामविकास पॅनलची सरशी
By admin | Published: August 08, 2015 12:31 AM