मुंढवा : राज्य सरकार नियुक्त त्रिसदस्य समितीने तयार केलेला विकास आराखडाच मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथील शेतकरी व अॅड. राजशेखर गायकवाड यांनी पत्राद्वारे गुरुवारी निवेदन देऊन केली.शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम व त्यांच्या समितीने विकास आराखडा तयार करून सरकारकडे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच तो सादर केला असून, त्यावर अद्याप पालिकेच्या प्रारूप आराखड्यातील सुमारे ३५० आरक्षणे वगळली आहेत. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे, की १९८७च्या विकास आराखड्याची अवघी ३० टक्केच अंमलबजावणी झाली आहे. उपनगरांतील रस्तेही पालिकेला विकासित करता आलेले नाहीत. त्यामुळे त्यामुळे पूर्वीच्या आराखड्याची अगोदर अंमलबजावणी करावी, त्यानंतर नव्या आराखड्याची चर्चा करावी, तसेच त्रिसदस्य समितीचाच आराखडा मंजूर करावा.
त्रिसदस्य समितीचा आराखडाच मंजूर करा
By admin | Published: October 15, 2016 5:39 AM