पिंपरी : कोरोनाच्या (कोविड १९) कठीण काळात विविध उपक्रमांच्या निधीला कात्री लागत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठरविल्याप्रमाणे दिव्यांग योजना राबवित त्यावर सहा महिन्यांत जवळपास १४ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. शिष्यवृत्ती, पेन्शन, मतिमंद मुलांच्या पालकांना अर्थसहाय्य, घरकुल आणि विवाह योजना अशा उपक्रमांवर खर्च करीत दहा हजारांहून अधिक दिव्यांगांना मदतीचा हात दिला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च-२०२० मध्ये टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आली. उद्योग, धंदे आणि व्यवसाय ठप्प पडले. महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या महसुलातही कमालीची घट झाली. राज्य सरकारनेच अत्यावश्यक कामे वगळता इतर खर्चावर कात्री लावली. महापालिकेने दिव्यांगांची स्थिती लक्षात घेत दिव्यांग योजनांच्या निधीत कपात केली नाही. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत नि:समर्थ अपंग कल्याणकारी योजना राबविण्यात येते. त्यासाठी २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी २७ कोटी १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने १ एप्रिल ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत १३ कोटी ९२ लाख रुपये खर्च केले आहेत.
महापालिकेच्या नागरवस्ती विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी येवले म्हणाले, कोरोनाच्या काळात दिव्यांग, कुष्ठरुग्ण, मतिमंद मुलांचे आणि व्यक्तींचे पालक यांना मदत व्हावी यासाठी दरमहा रक्कम देण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जातात. मात्र, त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक जण त्यापासून वंचित राहतात. कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने प्रमुख योजनांवर केलेला खर्चयोजनेचे नाव लाभार्थी रक्कम मूकबधिर, मतिमंद विद्यार्थी शिष्यवृत्ती १७५ ४२ लाखमतिमंद मुले-व्यक्तींचा सांभाळ २,४२४ ३.७१ कोटीदिव्यांग पेन्शन योजना ७,६४२ ८.८१ कोटीसदृढ व्यक्ती-दिव्यांग विवाह १५ १५ लाखकुष्ठरोग पीडित अर्थसहाय्य २८८ २२.९२ लाखव्यवसाय अर्थसहाय्य ८ ७.८१ लाखम्या प्रधानमंत्री आवास योजना ४७ ४७ लाख
अडीच हजार जणांना दरमहा दिले अडीच हजार मतिमंद मुले आणि व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या सुमारे अडीच हजार व्यक्तींना दरमहा अडीच हजार रुपये दिले. पेन्शन योजने अंतर्गत साडेसात हजारांहून अधिक व्यक्तींना पावणेनऊ कोटी रुपयांची मदत करण्यात आली. तर, २८८ कुष्ठ रुग्णांना २२ लाख ९२ हजार ५०० रुपयांची मदत केली आहे.