वडगाव मावळ : तळेगाव-चाकण रोडवरील काच कारखान्याजवळ बुधवारी अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभाग कार्यालयाच्या पथकाने कारवाई केली. सुमारे दीड लाखाचे मद्य जप्त करण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दि. १ एप्रिल २०१७ पासून राष्ट्रीय, राज्य महामार्गानजीकच्या ५०० मीटर अंतराच्या आतील मद्यविक्री परवाने बंद करण्यात आलेल्या असल्याने अवैधरीत्या मद्यविक्री होऊ नये या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून गस्त घालण्यात येत आहे. संशयास्पद चारचाकी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात देशी व विदेशी मद्य मिळून आले. दोन आरोपी, वाहनासह मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मोहन वर्दे व उपअधीक्षक सुनील फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब, उपनिरीक्षक संजय सराफ, नरेंद्र होलमुखे, सहायक दुय्यम निरीक्षक रवींद्र भूमकर, जवान अतुल बारंगुळे, प्रमोद पालवे, संतोष गायकवाड, शिवाजी गळवे यांच्या पथकाने कारवाई केली. तपास उपनिरीक्षक संजय सराफ करत आहेत. (वार्ताहर)
चाकण रस्त्यावर दीड लाखाचे मद्य जप्त
By admin | Published: April 27, 2017 4:58 AM