पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील वडमुखवाडी, चोविसावाडी, चिखली तळवडे परिसरातील ६९ बांधकामांवर हातोडा मोहीम राबविण्यात आली. पोलीस बंदोबस्तात बांधकामे पाडण्यात आली आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची जबाबदारी सह शहर अभियंता आयुबखान पठाण यांच्याकडून काढून घेऊन स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील यांच्यावर सोपविली होती. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बांधकाम परवाना विभागात बदल केले होते. त्यानंतर कारवाईसाठी समन्वयकही नियुक्त करण्यात आला होता. आठ क्षेत्रीय कार्यालयांनुसार अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाईचे नियोजन केले होते. सुरुवातीला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर मागील आठवड्यापासून भोसरी विधानसभा मतदारसंघातील बांधकामांवर कारवाई सुरू केली. मागील आठवड्यात चºहोली परिसरातील वडमुखवाडी, चोविसावाडी येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. वडमुखवाडी येथील कानिफनाथ चौकाजवळ वडमुखवाडी रस्त्यालगत एक मोठे पत्राशेड अंदाजे चार हजार चारशे चौरस फूट प्रत्यक्ष कारवाई केली, तसेच दोन पत्राशेड आणि तीन चालू अनधिकृत पत्राशेड, गोडाऊन असे क्षेत्रफळ अंदाजे ११ हजार चौरस फूट पाडण्यात आले.तीन दिवसांत अतिक्रमणविरोधी पथकाने सुमारे ४३ हजार चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले.
शहरातील ६९ बांधकामांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:04 AM