पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र केली आहे. ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १६ येथील रावेत, मामुर्डी व किवळे येथे महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत चार बांधकामांवर कारवाई केली.अनधिकृत बांधकाम नियमित करताना भविष्यात होणारी विनापरवाना बांधकामे रोखायला हवीत, उपाययोजना करायला हव्यात, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मागील आठवड्यात राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनीही अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला होता. सर्रास बांधकामे सुरू आहेत. मात्र, महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. कारवाईस टाळाटाळ करीत असून, विरोधकांच्या बांधकामांवर कारवाई करीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत संबंधित विभागाची बैठक घेऊन आरोपांची दखल घेतली होती. स्वत: विविध भागाचा दौरा करणार असून, कारवाई न करणाºयांची गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला होता.याबाबत ‘लोकमत’ने ‘अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल महापालिकेने घेतली आहे. आयुक्तांचा आदेश आणि लोकमतचे वृत्त यांची दखल घेऊन महापालिकेतील अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरू केली आहे. ब प्रभागातील रावेत, मामुर्डी व किवळे भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. कारवाईमध्ये वीट बांधकाम ०२ व पत्राशेड ०२ अशी एकूण १९९६ चौ. फुटांची ०४ बांधकामे बांधकाम पाडण्यात आली. कारवाईत कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने केली. कारवाई ०५ मनपा पोलीस कर्मचारी, ०१ ट्रॅक्टर, ०१ जेसीबी व ०८ मजूर व १० मनपा कर्मचारी, तसेच देहूरोड स्टेशनच्या पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात आली.
अनधिकृत बांधकामांवर हातोडा मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:36 AM