रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘क’ व ‘ड’ प्रभाग यांच्या वतीने ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या पिंपरी प्रभाग क्रमांक ४३ शगुन चौक, बी ब्लॉक २२ ब रिव्हर रस्ता तीन बांधकामे व काळेवाडी येथील सात बांधकामे व पत्राशेडवर कारवाई करून १६४०० चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. ऐन पावसाळ्यात व सणासुदीच्या दिवसांत पालिका शासनाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पिंपरी येथील रिव्हर रस्त्यावरील व शगुन चौकातील बी ब्लॉक २२ येथील तीन बांधकामांवर कारवाई करून सुमारे ३५०० चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे पेव रहाटणी ,काळेवाडी, थेरगाव यासह शहरात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अनेक जमीनमालक अनधिकृत पत्राशेड उभारून भाड्याने देत आहेत. यावर पालिका प्रशासन कारवाई का करत नाही, असा सवाल काही जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत.ही कारवाई कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग क व ड यांच्या पथकाने केली. या वेळी एक उपअभियंता, दोन कनिष्ठ अभियंता, १० बीट निरीक्षक, एक सर्वेअर पालिकेचे १० कर्मचारी, दोन जेसीबी, ट्रक, ब्रेकर, १५ मजूर, पालिकेचे १५ पोलीस कर्मचारी, तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे दोन सहायक पोलीस निरीक्षक, १० पोलीस कर्मचारी यांच्या साह्याने ही कारवाई कारण्यात आली.पूररेषा : नव्याने सुरू असलेली बांधकामे पाडलीकाळेवाडी येथील बी टी मेमोरियल शाळेच्या आवारातील पूररेषेमधील नव्याने सुरू असलेले अंदाजे ३००० चौरस फुटांचे तिसºया मजल्यावरील व किनारा कॉलनी येथील पूररेषेतील २१०० चौरस फुटांचे तळमजल्यावरील बांधकाम आणि याच कॉलनीतील ६००० चौरस फुटांचे दोन पत्राशेड, शांती कॉलनी येथील हजार चौरस फुटांचे आरसीसी दोन वाढीव बांधकामे आणि गुलमोहर सोसायटी येथील पहिल्या मजल्याचे ८०० चौरस फुटांचे वाढीव बांधकाम अशा प्रकारे चार आरसीसी बांधकाम व तीन पत्राशेडवर कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आले. सलग दोन दिवस कारवाई करून सुमारे १६४०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाºयांचे धाबे दणाणले आहे.
अनधिकृत बांधकामावर हातोडा; महापालिकेची कारवाई, ‘क’ व ‘ड’ प्रभागातील पत्राशेड केले जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 6:03 AM