लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : उन्हाच्या वाढत्या तडाख्याने पिंपरी-चिंचवडकर हैराण आहेत. शुक्रवारी शहरात ४१.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. सर्वसाधारण तापमानापेक्षा शुक्रवारचे तापमान दिवसभर अधिक होते. वाढत्या उन्हाने नागरिकांच्या शरीराची लाही लाही झाली आहे. दुपारच्यावेळी नागरिक घराबाहेर पडणेही टाळत आहेत. अशातही उन्हात बाहेर पडायचे असल्यास डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल, हातमोजे परिधान केले जात आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर कडक उन असले तरी पाचच्या सुमारास ढगाळ वातावरण झाले होते. यामुळे काहीसा दिलासा मिळाला. येत्या आठवडाभर शहराचे तापमान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
उन्हाच्या तडाख्याने शहरवासीय हैराण
By admin | Published: May 06, 2017 2:25 AM