पुणे : ग्रीस येथे होणाऱ्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेकरिता वडगांव मावळ येथील दूबेज गुरुकुलची खेळाडू हर्षदा शरद गरुड हीची भारतीय संघात निवड झाली. सदर स्पर्धा 2 मे ते 6 मे 2022 रोजी ग्रीस येथे होणार आहेत. हर्षदा 45 किलो वजनी गटात सहभागी होणार आहे.
2019 मध्ये ताशकंद येथील आशियाई स्पर्धेत ज्युनिअर गटात हर्षदा गरुड हिने कास्य पदक प्राप्त केले होते. बिहरीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली व जागतिक स्पर्धत भारताच प्रतिनिधित्व करणारी ही दुसरी खेळाडू आहे. मार्च 1990 मध्ये जागतिक क्रॉसकंट्री स्पर्धेत वैशाली खामकर हिने भारताचे प्रतिनिधित्व केलं होत. याबाबत बिहारीलाल दुबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वडगांव मावळ ही वेटलिफ्टींगची पंढरी म्हणून ओळखली जाते. जागतिक स्पर्धेत हर्षदाची निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, आणि त्याच बरोबर तिथेही ती चांगली कामगिरी करेल अशी खात्री व्यक्त केली. वडगांव मावळ येथे राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत पदक विजेते अनेक खेळाडू असताना ,वडगांव मधे मात्र अद्यायावत वेटलिफ्टींग खेळाचे ट्रेनिंग सेंटर नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.