वडगाव मावळ : जाभूळ गावच्या रस्त्याचे खड्डे मोजा आणि बक्षीस मिळवा हे वृत्त ९ आॅगस्ट ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार एका युवकाने या रस्त्यावरील सकाळपासून दुपारपर्यंत खड्डे मोजले. ती संख्या झाली १४९०़ खड्डे मोजणाऱ्या युवकाला ग्रामस्थांनी ५ हजार रुपये रोख बक्षीस दिले.मावळ तालुक्यातील रस्त्यांचे खड्डे भरण्यासाठी पंचायत समिती बांधकाम व सार्वजनिक बांधकाम खात्याने वर्षभरात २७ कोटी रुपये खर्च करूनही तालुक्यातील एकही रस्ता चांगला नाही. गावोगावी रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डे मोजा आणि बक्षीस मिळवा जांभूळ ते महिंद्र कंपनीकडे जाणाºया रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांत ५० लाख रुपये खर्च केला. आंदर मावळातील ५० गावांतील नागरिक जवळचा रस्ता म्हणून येतात. परंतु निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पावसामुळे रस्त्यावर तळे झाले आहे. या रस्त्यावरचे खड्डे मोजा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा माजी सरपंच संतोष जांभूळकर यांनी केली होती.भास्कर भोई या युवकाने सकाळी खड्डे मोजण्यास सुरुवात केली. हायवे ते रेल्वेगेट ९६ खड्डे, रेल्वेगेट ते व्हिजन सिटी ८२, व्हिजन ते ग्रामपंचायत कार्यालय ४२, ग्रामपंचायत कार्यालय ते महिंद्र कंपनी ५२३ असे एकूण१४९० खड्डे मोजले. माजीसरपंच संतोष जांभूळकर यांनीत्या युवकाला ५ हजार रुपये रोख देऊन त्याचा माजी सरपंच रवी गायकवाड, अमोल धिंदे, चिंतामण काकरे, यशवंत पोरवडे याच्या हस्ते सत्कार केला.
खड्डे मोजून त्याने मिळवले पाच हजार रुपयांचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 12:58 AM