शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

होता तो सराईत गुन्हेगार पण त्याने धुमाकुळ घातला ‘तोतया पोलीस’ म्हणून..  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 7:32 PM

पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर कळेल, मी कोण आहे असे दरडावत पोलिसाच्या अविर्भावात वावरणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी भोसरी येथून जेरबंद केले.

ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आवळल्या मुसक्या चाकण तसेच पुणे शहर पोलिसांकडे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून हॉटेलांमध्ये फुकट खायचे,पथारीवाल्यांना दमदाटी करून हप्ते मागायचे, पान टपरीवाल्यांना धमकावुन मिळेल ती रक्कम घ्यायची.. कोणी विचारलेच तर गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी आहे. पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर कळेल, मी कोण आहे असे दरडावत पोलिसाच्या अविर्भावात वावरणाऱ्या  भामट्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी भोसरी येथून जेरबंद केले. चाकण पोलिसांकडे त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कुंडली मिळाली असून राजेंद्र मोहन पाटेकर (रा.भोसरी) असे या तोतया पोलीस अधिकाºयाचे नाव आहे. भोसरीतील संत तुकारामनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ राहण्यास असलेल्या राजेंद्र मोहन पाटेकर या आरोपीचे वय ५५ वर्षे आहे. पोलिसांना सोजेसे व्यक्तीमत्व असलेल्या या आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.  पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करीत चाकण परिसरात हॉटेल व्यवसायिक, पानटपरीचालक,पथारीवाले आणि किराणा दुकानदार यांच्याकडून एकजण पैसे उकळत असल्याची माहिती गुन्हे शखा युनिट एकचे पोलीस हवालदार दिपक खरात, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना याबातची माहिती देण्यात आली. आरोपीचे छायाचित्रही प्राप्त झाले होते. २६ डिसेंबर २०१८ ला बुधवारी तो भोसरीत अंकु श लांडगे सभागृहाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे व पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले. त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासली असता, त्याच्याविरोधात चाकण तसेच पुणे शहर पोलिसांकडे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. त्याला चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन,अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस हवालदार दिपक खरात, प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर, गणेश मालुसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक