पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी आयोजित दुसरे प्रशिक्षण शनिवारी आणि रविवारी दोन प् सत्रात चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर व भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह येथे झाले. मोरे प्रेक्षागृह येथे प्रथम सत्रातील प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ५ च्या मंजिरी मनोलकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे, मकरंद निकम, संजय गवळी, प्रशिक्षण कक्ष प्रमुख तथा सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मास्टर ट्रेनर प्रा. नरेंद्र बंड, सहायक प्रशिक्षक किशोर गावडे, मनोज मराठे, शिवाजी लाटे आदी उपस्थित होते. मनोलकर यांनी मार्गदर्शन केले. ईव्हीएमचे प्रात्यक्षिक भगवान मोरे यांनी घेतले. प्रा. बंड यांनी प्रशिक्षण दिले व निवडणूक कामकाज समजावून सांगितले. दुसऱ्या सत्रातील प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ६ चे संजीव देशमुख, प्रशिक्षण कक्ष प्रमुख इंदलकर, मास्टर ट्रेनर सतीशकुमार मेहेर, ईव्हीएमचे मास्टर ट्रेनर भगवान मोरे, शिवाजी लाटे आदी उपस्थित होते. देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. (प्रतिनिधी)
केंद्राध्यक्ष, अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
By admin | Published: February 14, 2017 2:05 AM