निगडी : औद्योगिकरणाचा झपाट्याने होणारा विकास यामुळे देशी, परदेशी कंपन्या शहरात तसेच तळेगाव, चाकण, भोसरी एमआयडीसीमध्ये आपला पाया भक्कम करत आहेत. परंतु वाढत्या कंपन्यांबरोबरच मालवाहतूक करणारी वाहने व बेशिस्त वाहणाचालकांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.निगडीतील भक्ती-शक्ती चौक, अंकुश चौक, त्रिवेणीनगर, टिळक चौक, दुर्गानगर चौकातून भोसरी, चाकण, तळवडे एमआयडीसीकडे
जाणाऱ्या कामगारांच्या व माल वाहतूक करणाºया वाहनांची मोठी वर्दळ असते. अतिशय वेगाने वाहने चालवणारे वाहनचालक आपल्या कंपनीत वेळेवर पोहोचण्यासाठी वाहनचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. यामुळे चौका चौकांत उभे असणारे वाहतूक पोलिसांना अशा भरधाव वेगात चालवणाºया बेशिस्त वाहन चालकांशी सामना करावा लागत आहे. यामुळे या रस्त्यावरून रोजच प्रवास करणाºया नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ मंडळींना बेशिस्त वाहतूक डोकेदुखी ठरते. रोजच किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे.एमआयडीसी परिसरात भुरट्या चोºयांत वाढनिगडीतील ट्रान्सपोर्टनगर, चिंचवड, भोसरी, चाकण एमआयडीसीमध्ये काम करणाºया कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी परिसरात रोजच भुरट्या चोºयांत वाढ झाली आहे. एमआयडीसीतील कंपनीचे कामकाज तीन शिफ्टमध्ये चालू असते़ दुपार शिफ्टमधील कामगारांची सुटी रात्री १२ ते १ च्या सुमारास होते़ यामुळे एमआयडीसी परिसरातून घरी परतत असलेल्या कामगारांना रस्त्यात अडविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोबाइल हिसकावणे, पाकिटातील पैसे काढून घेण्याचे प्रकार सध्या एमआयडीसी परिसरात होत आहे़ यामुळे एमआयडीसी परिसरातील कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळेत पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी कामगार वर्गातून होत आहे.