मोशी : ई-कचरा विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नसल्याने शहराचे पर्यावरण धोक्यात आलेआहे. पर्यायाने त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.महापालिकेने ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी उत्तम जनजागृती करून घरोघरी वेगवेगळे कचºयाचे डबे वाटण्याचा उपक्रम गेल्या वर्षभरात सुरू केला आणि त्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसादही दिला. त्यामुळे आता ई- कचºयासाठीही अशाच प्रकारे जनजागृती करणे गरजेचे आहे. संगणक, त्याचे सुटे भाग, मोबाईल, केबल्स, सेल्स, किबोर्ड, माऊस, हेडफोन, पेन्सिल सेल, बॅटरी, चार्जर, प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींचा समावेश ई- कचºयामध्ये होतो.जून २०१४ रोजी शहरातील ई-कचरा (ई-वेस्ट) चा भविष्यकाळातील धोका लक्षात घेऊन महापालिकेने घरोघरी जाऊन ई-कचरा गोळा करण्याची योजना जाहीर केली होती. त्यानुसार असा कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यासाठी एक मोबाईल व्हॅन सुरू केली होती. परंतु, नागरिकांच्या प्रतिसादा अभावी हा प्रयोग महिनाभरातच अयशस्वी झाला.योजना राहिली कागदावरई-कचºयाची विल्हेवाट लावण्याबाबत महापालिका पर्यावरण विभागाने गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. प्रायोगिक तत्त्वावरील हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार होती. तसेच स्वत:ची ई-कचरा मोबाईल व्हॅन बनविण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली होती. आयटी पार्क व उद्योगनगरी असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक, त्याचे सुटे भाग, मोबाईल, केबल्स, सेल्स, किबोर्ड, माऊस, हेडफोन आदी ई-कचरा मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. सध्या शहरात दररोज दहा ते पंधरा टन असा कचरा तयार होत असल्याचा पालिका प्रशासनाचा अंदाज आहे.
ई-कचºयामुळे आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 6:36 AM