- संजय मानेपिंपरी : मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केल्यानंतर राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. पिंपरीचा पहिला आयुक्त होण्यासाठी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजपातील पक्षश्रेष्ठींकडे लॉबींग सुरू केले आहे.नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक गुन्हेगारीचे प्रमाण आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून उद्योगनगरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी होत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील व भाजपाचे अमर साबळे, विधान परिषदेच्या सदस्या डॉ. निलम गोºहे, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, भोसरीचे महेश लांडगे व चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांनीही आयुक्तालयाच्या मागणी केली. अधिवेशनांत तारांकित प्रश्न व लक्षवेधी मांडून या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले होते.
आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 3:48 AM