शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

दमदार पावसाने सुखावला बळीराजा

By admin | Published: June 10, 2017 2:03 AM

शुक्रवारी सायंकाळी लोणावळा परिसर आणि मावळ तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : शुक्रवारी सायंकाळी लोणावळा परिसर आणि मावळ तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. सुमारे दोन तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. हा पाऊस खरिपाच्या तयारीसाठी अतिशय पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.शहर व परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाची रिपरिप सुरू होती. काही दिवसांपासून लोणावळा परिसरात सायंकाळच्या सुमारास आभाळात ढग दाटून पावसाचा शिडकाव होत होता. शुक्रवारी सकाळपासूनच लोणावळ्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काळ्या ढगांची हवेत दाटी होऊन पावसाला सुरुवात झाली. लोणावळा शहरासह परिसरातील वाकसई, वरसोली, कुसगाव, डोंगरगाव, औंढे, औंढोली, देवघर, कार्ला, पाटण, मळवली, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे, टाकवे या सर्व गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. भातरोपांची पेरणी झाली असल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत असताना झालेले मॉन्सूनचे आगमन हे सुखकारक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.लोणावळा नगर परिषदेकडून प्रलंबित राहिलेल्या इंद्रायणी नदी सफाईच्या कामालाही दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. हे काम लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.शेतकऱ्यांचे चेहरे खुललेकामशेत : गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊनही हुलकावणी देणाऱ्या पावसाने अखेर कामशेतमध्येही दमदार हजेरी लावली.गेले काही दिवस ढगाळ हवामान तयार होऊन सोसाट्याचा वारा येत होता. पण, पाऊस पडत नव्हता. दर वर्षी ७ जूनला मावळात हमखास पडणारा पाऊस या वर्षी पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. अनेकांच्या भात पेरण्या रखडल्या होत्या. पण, शुक्रवारी दुपारनंतर कामशेतसह मावळातील अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत.कामशेत येथे दुपारनंतर पाऊस सुरू झाला. नंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला. अनेक नागरिक व प्रवाशांची यामुळे मोठी धावपळ उडाली. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. शहरातील किरकोळ विक्रेत्यांना दुकाने आवरती घ्यावी लागली. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद मुलांनी लुटला. पावसापासून वाचण्यासाठी अनेकजण रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये, तसेच मिळेल त्या आडोशाला थांबताना दिसत होते. अनेक हॉटेल व चहाच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. गहुंजेत मोठ्या पावसाची प्रतीक्षाकिवळे : रावेत, किवळे, देहूरोड, गहुंजे, सांगवडे परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहापासून हलक्या पावसाला सुरुवात झाली. मात्र, परिसरातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. किवळे व गहुंजे परिसरातील पवना नदीच्या पाण्याची सोय उपलब्ध असल्याने काही शेतकऱ्यांनी भात बी पेरले असून उगवलेल्या रोपांसाठी हा पाऊस अत्यंत पोषक असला तरी भात रोपांच्या वाढीसाठी खरीप हंगामातील इतर पिकांच्या पेरण्यांसाठी जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.जून महिन्याच्या सुरुवातीपासून चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना या पावसाच्या हलक्या सरींनी काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या अखेरीला व जूनच्या सुरुवातीला धूळ वाफेवर व पाण्याची सोय असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी पाऊस पडण्याच्या शक्यतेने भाताची पेरणी केली होती. मात्र, वळवाच्या पावसाने हुलकावणी दिली होती. पुरेसा पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. पावसाचे काहीसे दिलासादायक आगमन झाल्याने शेतकरी पावसाबाबत आशावादी बनला असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत आहे. सायंकाळी सातपर्यंत पाऊस सुरू होता.